मराठी मनोरंजन सृष्टीतून समाजात घडणाऱ्या सामाजिक वा राजकीय परिस्थितीवर व्यक्त होण्याबाबत कायमच उदासीनता पाहायला मिळाली आहे. मराठीतील फार क्वचित कलाकारच सद्य राजकारण, समाजकारण या विषयांवर उघडपणे बोलतात किंवा व्यक्त होतात. मात्र काही कालाकार या परिस्थितीला अपवाद असतात. मराठी काही मोजके कलाकार सध्याच्या राजकारणावर ट्रोलिंग किंवा टीका यांची तमा न बाळगता आपले मत व्यक्त करतात. सध्याच्या समाजकारणावर एका मराठी अभिनेत्रीने तिचं व्यक्त केलं आहे. (Ashwini Mahangade On Maratha Andolan)
काल (२७ जानेवारी) रोजी मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सुटला. गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरु असलेला मराठा समाजाचा लढा अखेर संपला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यामुळे मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे ठिकठिकाणी विजयोत्सव साजरा केला जात आहे. या मराठा आरक्षणाच्या लढ्याला अनेक मराठी कलाकारांनीदेखील आपला पाठिंबा दिला होता. अशातच आता मागण्या मान्य झाल्यावर कलाकारांनीही आनंदाची पोस्ट शेअर करायला सुरुवात केली आहे. नुकतीच लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने एक व्हिडिओ शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री अश्विनी महांगडेनेदेखील या विजयाबद्दल तिचा आनंद व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “कोणत्याच अटी नाहीत पण…” पृथ्वीक प्रतापने भावी पत्नीबाबत केलं भाष्य, म्हणाला, “माझ्या मागण्या…”
अश्विनीने मराठा आरक्षणाच्या संपूर्ण संघर्षात ‘संघर्षयोध्दा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत अभिनंदन असं म्हटलं आहे. “जंग लडाई जाती है जितने के लिए, जीत हासिल करते है इतिहास के लिए” असं घोषवाक्य असलेला एक रील व्हिडीओ अश्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला असून त्याखाली तिने अभिनंदन असं म्हटलं आहे. यावरुन तिने या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, नुकताच अश्विनीने मनोज जरांगे पाटील यांचा गाडीत थकून भागून बसलेला एक फोटो शेअर करत “आज समाजाचा एक भाग म्हणून या आंदोलनात सोबत करणे हे माझे कर्तव्य वाटते. हा फोटो माणूस म्हणून बघाल तर जीवाची घालमेल होईल” असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणावर अभिनेत्रीने आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.