सध्या देशात सर्वत्र राममय वातावरण झाले आहे. उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणा सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. उद्या होणाऱ्या या सोहळ्यासाठी राजकारण, उद्योग, खेळ व मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच अयोध्येत दाखल झाली आहे. (Kangana Ranaut On Instagram)
अभिनेत्री कंगणा रणौत नुकतीच पोहोचली अयोध्येत पोहोचली आहे. कंगणा शनिवारी (२० जानेवारी) अयोध्येत पोहोचली. त्यानंतर आज अभिनेत्रीने संस्कृत विज्ञान पद्म विभूषण स्वामी रामभद्राचार्य महाराज यांची भेट घेतली. या भेटीचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना रामभद्राचार्य यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. अशातच कंगनाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समाजसेवा करताना दिसत आहे. कंगना हनुमानाच्या मंदिरात झाडू मारताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं आहे, “हनुमान मंदिरात सफाई केली. पण गर्दी जास्त झाली.” कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून कंगणाच्या या कृतीमुळे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अनेकजण जाणार आहेत.
आणखी वाचा – लेकीच्या लग्नानंतर आमिर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या मित्राचे अपघाती निधन, अभिनेत्याला शोक अनावर
अयोध्यानगरीत प्रत्येकजण आपापली सेवा अर्पण करत आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रोफ यांचादेखील साफसफाई करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अशातच आता कंगणाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.