शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“फक्त अश्रू अनावर झाले अन्…”, नरेंद्र मोदींची आर्या आंबेकरसाठी कौतुकास्पद पोस्ट, गायिका भावुक, म्हणाली, “यापेक्षा मोठं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 19, 2024 | 10:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arya Ambekar Emotional Post

"फक्त अश्रू अनावर झाले अन्…”, नरेंद्र मोदींची आर्या आंबेकरसाठी कौतुकास्पद पोस्ट, गायिका भावुक, म्हणाली, "यापेक्षा मोठं..."

अयोध्यातील बहुप्रतीक्षित ऐतिहासिक श्री राम मंदिर अवघ्या काही दिवसांत भक्तांसाठी खुले होणार आहे. या भव्य दिवसाची सारे भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सोहळा २२ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे. मंदिर परिसरात राम लल्लाच्या मुर्तीच्या प्राण प्रतिष्ठेच्या भव्य समारंभाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण भारतवासीय या दिवसाच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच रामभक्तीच्या या सोहळ्याला चारचाँद लावण्यासाठी एका रामभक्तीच्या गीताने साऱ्यांच्या मनावर राज्य केलं आहे. (Arya Ambekar Emotional Post)

रामभक्तीवर आधारित असलेलं हे ‘जयश्रीराम भजन’ साऱ्या रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. गायक सुरेश वाडकर व गायिका आर्या आंबेकर हिने स्वरबद्ध केलेलं हे गाणं सारेच गुणगुणू लागले आहेत. या गाण्याची स्तुतीपर पोस्ट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केली. ही पोस्ट शेअर करत त्यांनी सुरेश वाडकर व आर्या आंबेकर या दोघांचंही भरभरुन कौतुक केलं. नरेंद्र मोदी यांनी ही पोस्ट शेअर करत, “अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा संदर्भात संपूर्ण देश भगवान श्रीरामाच्या भक्तीच्या रंगात रंगला आहे. सुरेश वाडकर व आर्या आंबेकर यांनी त्यांच्या मधुर सुरांमध्ये ही भावना व्यक्त केली आहे” असं कॅप्शन देत या भक्तिमय गाण्याची लिंक शेअर केली आहे.

आणखी वाचा – “चित्रपटगृहातून रजा घेताना…”, ‘झिम्मा २’च्या कलाकारांची भावुक पोस्ट, म्हणाले “तुमचं प्रेम, आपुलकी…”

View this post on Instagram

A post shared by Aarya Ambekar (@ambekaraarya)

यावर आर्या आंबेकर हिने भावुक पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळत आहे. आर्याने नरेंद्र मोदी यांची पोस्ट शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, “माननीयांचे निस्सीम प्रशंसक म्हणून. पंतप्रधान मोदीजी व त्यांचे कार्य. या पोस्टने मला फक्त अश्रू अनावर झाले. असा पराकोटीचा आनंद कधीच अनुभवला नव्हता. फक्त शब्दात मांडता येत नाही. आमचा हा खारीचा वाटा, ही सांगीतिक सेवा श्रीराम चरणी रुजू झाली. प्रत्यक्ष श्रीरामाचा आशीर्वाद जणू आमच्या पर्यंत पोचला, अशी भावना मनात निर्माण झाली” असंही म्हटलं आहे.

आणखी वाचा – बायकोसाठी बनला शेफ, गौतमी देशपांडेचे लाड पुरवतोय स्वानंद तेंडुलकर, खास पदार्थ अन्…

यापुढे त्यांनी, “प्रिय मोदीजी, २२ जानेवारीला मोठा दिवस साजरा करण्यासाठी आमच्या छोट्याशा योगदानाची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. खरेच, यापेक्षा मोठे कोणतेही प्रोत्साहन असू शकत नाही. तुमच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा, संगीताच्या माध्यमातून, माझ्या स्वतःच्या मार्गाने देशसेवा करण्याचा सदैव प्रयत्न करेन. अत्यंत आदराने नतमस्तक होऊन तुमच्या चरणांना स्पर्श करुन तुमचे आशीर्वाद मागत आहेत” असंही म्हटलं.

Tags: arya ambekararya ambekar and suresh wadkararya ambekar songentertainmentpm narendra modi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Aadesh Bandekars Son Soham gave special birthday wishes to his father with the photo see the details

“आपल्या शूजची साईज...", आदेश बांदेकरांना वाढदिवसानिमित्त लेकाने दिल्या खास शुभेच्छा, म्हणाला “माझ्या मनाची..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.