शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : डिझायरन ब्लाऊज, महागडे दागिने अन्…; मेहंदी सोहळ्यासाठी नटली आमिर खानची लेक, मेकअप करतानाचा व्हिडीओ समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 8, 2024 | 3:23 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nupur Shikhare and Ira Khan Marriage

डिझायरन ब्लाऊज, महागडे दागिने अन्...; मेहंदी सोहळ्यासाठी नटली आमिर खानची लेक, मेकअप करतानाचा व्हिडीओ समोर

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : आमिर खानची लाडकी लेक आयरा खान व नुपूर शिखरे यांनी ३ जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा मुंबईतील ताज एंड येथे उरकला. यानंतर हे नववरवधू त्यांच्या शाही रिसेप्शन सोहळ्यासाठी राजस्थान येथे पोहोचले आहेत. उदयपूरच्या ताज लेक पॅलेसमध्ये या जोडप्याच्या शाही लग्नाच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. आयरा-नुपूरच्या जवळच्या नातेवाईकांच्या व मित्र परिवाराच्या उपस्थितीत हा शाही रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. यावेळी त्यांच्या लग्नासाठी राजस्थानी थाटमाट पाहायला मिळणार आहे.

७ जानेवारीला रोमँटिक वेलकम डिनर पार्टीनंतर आज या जोडप्याच्या मेहंदी समारंभाचा आयोजन करण्यात आलं आहे. आयराने तिच्या इन्स्टाग्रामवर मेहेदी सोहळ्यासाठीच्या तिच्या खास लूकची झलक शेअर केली आहे. आमिर खानची लेक आयराच्या हातावर नुपूर शिखरेच्या नावाची मेहंदी लागणार आहे. आयराने तिच्या मेहेंदीचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. आयराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वॉकी टॉकी हातात घेऊन तयारीदरम्यान तिची हेरगिरी करणाऱ्या टीमची तक्रार करत होती.

आणखी वाचा – “अचानक गाडीमधून उतरले अन्…”, खालापूर टोलनाक्यावर राज ठाकरेंनी नेमकं काय केलं?, सिद्धार्थ जाधवने सांगितला संपूर्ण प्रकार

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आयरा मेहंदीसाठी तयार होताना दिसत आहे. यावेळी मेहंदी समारंभासाठीचा आयराचा लूक समोर आला आहे. आयराने मेहंदीसाठी घागरा चोळी परिधान केली आहे. पांढऱ्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी असलेला तिचा ब्लाउज लक्षवेधी ठरत आहे. या दरम्यान आयराचा मेकअप सुरु असलेला पाहायला मिळत आहे. मेहंदीसाठीच्या लूकमध्ये आयराने सोनेरी व मोत्याचे दागिने परिधान केलेले दिसत आहेत.

आणखी वाचा – हिऱ्यांचा वापर, युनिक डिझाइन अन्…; अमृता देशमुखचं मंगळसूत्र आहे फारच खास, सोशल मीडियावर रंगली चर्चा

काल रात्री आयरा व नुपूर शिखरे यांनी वेलकम डिनर पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आयराने काळ्या रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यावर साधासा असा नेकलेसही तिने घातला होता. तर नुपूरने काळा शर्ट व पॅन्ट घातली होती. या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकर गाणं गाताना दिसली. यादरम्यान, आयरा व नुपूरने रोमँटिक डान्सही केला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये आमिरची माजी पत्नी किरण राव पाहुण्यांचं स्वागत करत त्यांच्याशी गप्पा मारताना दिसत आहे. आयरा खान ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे. आयरा व नुपूर जोडप्याच्या लग्नाचे कार्यक्रम ७ जानेवारीपासून सुरू झाले असून १० जानेवारीला लग्नसोहळ्याने त्यांची सांगता होणार आहे.

Tags: entertainmentira khanIra khan and nupur Shikhare Weddingira khan mehendi ceremonynupur shikhare
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Which Cooking Oil Is Good
Lifestyle

‘या’ तेलामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिकाधिक वाढतंय, जेवणात कोणतं तेल वापरणं अधिक उत्तम?, डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार…

मे 8, 2025 | 7:00 pm
Video Viral From Pakistan
Social

“आम्ही भारताला थांबवूच शकलो नाही आणि…”, पाकिस्तान नागरिकाकडूनच भारताचा जयजयकार, पाक सैन्याचं सत्य समोर आणत…

मे 8, 2025 | 4:00 pm
Next Post
big b amitabh bachchan shared post on Lakshadweep vs maldives clash actor said we are india and we are aatmanirbhar

आमच्या आत्मनिर्भरतेवर गदा...”, मालदीव विरुद्ध लक्षद्वीप वादात बिग बी अमिताभ बच्चन यांचीही उडी, पोस्ट शेअर करत म्हणाले, “आम्ही भारत...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.