शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : आकर्षक इंटेरियर, मोठा हॉल अन्…; माधुरी पवारने खरेदी केलं स्वप्नातलं घर, व्हिडीओमध्ये कुटुंबियांचा दिसला साधेपणा

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2024 | 4:48 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress madhuri pawar shared special video of her new home on social media

Video : आकर्षक इंटेरियर, मोठा हॉल अन्…; माधुरी पवारने खरेदी केलं स्वप्नातलं घर, व्हिडीओमध्ये कुटुंबियांचा दिसला साधेपणा

गेल्या वर्षात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी नवीन घर घेत आपल्या स्वप्नांची पूर्तता केली. गेल्या वर्षात प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, धनश्री काडगांवकर, केतकी माटेगांवकर, ऋतुजा बागवे, मयूरी वाघ, अक्षय केळकर, प्रसाद खांडेकर, पृथ्विक प्रताप आदी कलाकारांसह प्रसाद ओक यांनीही नुकतेच नवीन घर घेतले. कलाकारांनी त्यांच्या नवीन घराचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली होती. अशातच यात आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे.  (Madhuri Pawar On Instagram)

आपल्या अभिनयाने व नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेली अभिनेत्री व नृत्यांगना म्हणजे माधुरी पवार. अभिनेत्री व नृत्यांगना माधुरी पवार ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ खास शेअर केला आहे. या व्हिडीओद्वारे तिने तिच्या चाहत्यांबरोबर नवीन घराबद्दलची गुडन्यूज शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Pawar (@madhuripawarofficial)

आणखी वाचा – ‘दादा एक गुडन्यूज’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई, मेहंदी-संगीत, ग्रहमख अन् पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये झालं व्याही भोजन

माधुरीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिने तिच्या अलिशान घराची खास झलक पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर तिच्या नवीन घरानिमित्त केलेल्या वास्तुशांतीची पूजादेखील या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. माधुरीने हा खास व्हिडीओ शेअर करत त्याखाली “नमस्ते वास्तु पुरुषाय भूषाय भिरत प्रभो | मद्गृहं धन धान्यादि समृद्धं कुरु सर्वदा” असं कॅप्शन दिलं आहे. तसेच यापुढे तिने ‘नवीन घर’ असा एक खास हॅशटॅगही दिला आहे.

आणखी वाचा – झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ मालिका प्रेक्षकांचं निरोप घेणार, धनश्री काडगांवकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

दरम्यान, माधुरीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये पूजेनिमित्त तिच्या कुटुंबियांनीदेखील खास हजेरी लावले असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अभिनेत्रीने शेअर केलेल्या या नवीन घराच्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी तिला नवीन घरानिमित्त शुभेच्छादेखील दिल्या आहेत.     

Tags: entertainment newsmadhuri pawarmarathi actressmarathi entertainmentnew homeनवीन घरमराठी अभिनेत्रीमाधुरी पवार
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
bigg boss 17 new promo ankita lokhande and Vicky jain fight because he talk with mannara chopra watch video)

सासूने जे ऐकवलं तेच नवऱ्यानेही सुनावलं, अंकिता लोखंडेचं वैवाहिक आयुष्य वादात, म्हणाला, “मुन्नवरला मिठी मारते अन्…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.