शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दादा एक गुडन्यूज’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई, मेहंदी-संगीत, ग्रहमख अन् पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये झालं व्याही भोजन

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 5, 2024 | 3:51 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
dada ek good news aahe play fame actor rishi manohar will be married soon sangeet and grahmakh photo viral on social media

'दादा एक गुडन्यूज' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याची लगीनघाई, मेहंदी-संगीत, ग्रहमख अन् पुण्याच्या ढेपे वाड्यामध्ये झालं व्याही भोजन

सध्या मनोरंजन विश्वात लगीनघाई सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्याच महिन्यात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी एकमेकांबरोबर विवाहगांठ बांधली. आमिर खानची लेक आयरा खानदेखील बॉयफ्रेंड नूपुर शिखरेबरोबर नुकतीच विवाहबंधनात अडकली. प्रथमेश-मुग्धा, स्वानंद-गौतमी, स्वानंदी-आशिष, सोनल-समीर, सुरुची-पियुष या लोकप्रिय कलाकारांनी आपल्या जोडीदाराबरोबर लग्नगाठ बांधली. अशातच आता मराठीतील आणखी एक अभिनेता विवाहबंधनात अडकणार आहे. (Rishi Manohar On Instagram)

‘दादा एक गुड न्यूज आहे’ फेम अभिनेता ऋषी मनोहर लवकरच विवाहबद्ध होणार आहे. या नाटकामध्ये ऋषीसह अभिनेता उमेश कामत, ऋता दुर्गुळे व आरती मोरे यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. दादा एक गुडन्यूज आहे या नाटकामुळे ऋषी बराच लोकपिय झाला. गेल्यावर्षी मे महिन्यात त्याचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये व्याहीभोजनाचा खास व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने लग्न करणार असल्याची बातमी त्याच्या चाहत्यांना दिली होती. पुण्यातील ढेपे वाड्यात त्यांच्या व्याही भोजनाचा खास सोहळा आयोजित करण्यात आला होता.  

View this post on Instagram

A post shared by Rishi Manohar (@rishi_r_manohar)

आणखी वाचा – झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ मालिका प्रेक्षकांचं निरोप घेणार, धनश्री काडगांवकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत

नुकतेच त्याने त्याच्या ग्रहमख व मेहेंदी सोहळ्याचे काही खास फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याने पिवळ्या रंगाचा कुर्ता व त्यावर पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला आहे. तर त्याच्या होणाऱ्या पत्नीने सुंदर नक्षीकाम असलेला ड्रेस परिधान केला असल्याचे पाहायला मिळत आहे. ऋषीने शेअर केलेल्या फोटो व व्हिडीओमध्ये त्याचे मित्रपरिवार व कुटुंबीय सहभागी झाल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – “बिकिनी घाल”, बायकोला विचित्र सल्ला देणाऱ्यावर भडकला सिद्धार्थ चांदेकर, म्हणाला, “तुमचे अहो घरी तुम्हाला…”

दरम्यान, ऋषी हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री पौर्णिमा गानू मनोहर यांचा लेक आहे. तर ऋषीच्या होणाऱ्या बायकोचं नाव तन्मई असं आहे आणि ती एक दंतरोगतज्ज्ञ म्हणून काम पाहते. ऋषीने शेअर केलेल्या या फोटोवर हृता दुर्गुळे, अजिंक्य राऊतसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट्सद्वारे कौतुक केले आहे. तर ऋषीच्या अनेक चाहत्यांनीही त्याचे अभिनंदन केले आहे.

Tags: dada ek good news aahemarathi actorMarathi newsRishi Manoharwedding newsऋषी मनोहर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
marathi actress madhuri pawar shared special video of her new home on social media

Video : आकर्षक इंटेरियर, मोठा हॉल अन्…; माधुरी पवारने खरेदी केलं स्वप्नातलं घर, व्हिडीओमध्ये कुटुंबियांचा दिसला साधेपणा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.