अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या अभिनयाने व नृत्यकौशल्याने अनेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. क्रांती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. क्रांती ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लेकींचे मजेशीर व्हिडीओही पोस्ट करत असते. त्यांच्या अनेक करामती ती व्हिडीओद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत असते आणि तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील उत्तम प्रतिसाद मिळत असतो. अशातच क्रांतीने नुकताच आणखीन एक नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. (Kranti Redkar On Instagram)
सध्या हिवाळ्याचा मौसम सुरु झाला असून सर्वत्र थंडी जाणवत आहे. अशातच आज सकाळी मुंबईमध्ये सर्वत्र धुकसदृश वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईमध्ये आज सकाळी धूर व धुके यांचे मिश्रण असलेले वातावरण होतं आणि हे वातावरण का होतं? कश्यामुळे झालं होतं? असा प्रश्न क्रांतीच्या लेकीला पडला आणि यावर तिनेच तिचे भन्नाट उत्तरदेखील दिले. तिच्या या उत्तराचाच एक खास व्हिडीओ क्रांतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. देवबाप्पा जेवण बनवत असल्यामुळे हा धूर झाला असल्याचे क्रांतीच्या लेकीने यात म्हटले आहे.
या व्हिडीओमध्ये क्रांतीने असे म्हटले आहे की, “आज हवेमध्ये थोडे प्रदूषण आहे. ढग दिसत नाही आहेत आणि सर्वत्र धुके असल्याचे भासत आहे. तर हे असं का झालं आहे?” असा छबीलने मला प्रश्न विचारला. यावर “मी काही माहीत नाही हे असं का आहे” म्हटलं. तर यावर छबीने “देव बाप्पा जेवण बनवत आहे. जेवण बनवताना स्वयंपाकघरात जसा धूर होतो, तसा आज सगळीकडे धूर झाला आहे” असं उत्तर दिलं. यावर क्रांतीने तिला “देवबाप्पा कुणासाठी जेवण बनवत आहे?” असं उत्तर दिलं. यावर तिच्या लेकीनेही “देवबाप्पा गोरीनानू (समीर वानखेडे यांची आई) व पृथ्वीदादा (क्रांतीचा भाचा) जे आज देवबाप्पाकडे आहेत. त्यांच्यासाठी देव जेवण बनवत असल्यामुळे सर्वत्र धूर झाला आहे” असे म्हटले.
आणखी वाचा – “तू जास्तचं भोगलं आहेस अन्…”, केदार शिंदेंची बायकोसाठी भावुक पोस्ट, “माझ्या आयुष्यात येणं ही…”
दरम्यान, क्रांतीने शेअर केलेल्या या मजेशीर व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ऋषी सक्सेना, अमृता खानविलकर, गांधी साक्षी यांनी “कित्ती गोड” असं म्हणत कमेंट्स केल्या आहेत. तर क्रांतीच्या अनेक चाहत्यांनीही तुमच्या मुली खरंच खूप गोड आहेत, हे फक्त लहान मुलंच विचार करू शकतात, अगदी बरोबर, लहान मुलं किती निरागस असतात ना?” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओवर पसंती दर्शवली आहे.