रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिग्पाल लांजेकरांच्या ‘शिवरायांचा छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, ‘हा’ अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 4, 2024 | 12:54 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
digpal lanjekar directorial shivrayancha chhava marathi movie new tease is out now

दिग्पाल लांजेकरांच्या 'शिवरायांचा छावा' या ऐतिहासिक चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर प्रदर्शित, 'हा' अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

लेखक-दिग्दर्शक व अभिनेता दिग्पाल लांजेकरने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांची शौर्यगाथा सांगणारे  ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेरशिवराज’, ‘सुभेदार’सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा इतिहास चित्रपटांमधून सर्वांसमोर मांडणारे लेखक-दिग्दर्शक दिग्पालने आणखी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी दिग्पालने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या आगामी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. (Shivrayancha Chhava Teaser)

या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. अशातच आता नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याविषयी अनेकांना उत्सुकता लागली होती. अशातच या टीझरमधून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची झलकही दिसत आहे. तसेच या टीझरमध्ये अभिनेत्याची वाघाबरोबरची साहसी दृश्येदेखील पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ नंतर नव्या भूमिकेत दिसणार रणबीर कपूर, रोहित शेट्टीबरोबर करणार काम, नवा लूक चर्चेत

‘कोण शत्रू यावरी, करील कैसा कावा, वाघालाही फाडतो, हा शिवरायांचा छावा’ असं हटके कॅप्शन देत हा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तर अभिनेता भूषण पाटील याने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या टीझरला अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी या व्हिडीओला चांगलीच पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट्समध्ये या चित्रपटासाठी उत्सुकतादेखील व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – नवरी नटली पण आमिर खानच्या जावयाने जिमच्याच कपड्यांमध्ये केलं लग्न, अनेक पाहुणेही होते उपस्थित, खास लूकची सोशल मीडियावर चर्चा

ए. ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट येत्या १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मल्हार पिक्चर्स कंपनीचे वैभव भोर, किशोर पाटकर व मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सहनिर्माते भावेश रजनीकांत पंचमतीया हे आहेत. संभाजी महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद व गाणीदेखील त्यांचीच आहेत. तसेच या गाण्यांना साजेसं संगीत संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे आणि पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.   

Tags: digpal lanjekardigpal lanjekar movieentertainment newsmarathi entertainmentmarathi movieshivrayancha chhava
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
south actress amala paul and jagat desai announced her pregnancy with flaunting her baby bump photos on social media

लग्नाच्या दोन महिन्यांमध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री गरोदर, बेबी बम्प दाखवत फोटो केला शेअर, म्हणाली, “आता आम्ही…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.