रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आमिर खानच्या लेकीच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी असणार ‘हा’ खास नियम, महाराष्ट्रीयन पद्धतीनेच होणार विवाह अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 3, 2024 | 10:03 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
aamir khan daughter ira khan nupur shikhare wedding no- gift policy guest will donate to ngo instead

आमिर खानच्या लेकीच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी असणार 'हा' खास नियम, महाराष्ट्रीयन पद्धतीनेच होणार विवाह अन्…

Nupur Shikhare and Ira Khan Marriage : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या घरी सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. अभिनेत्याची मुलगी आयरा खान बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर आज विवाहबंधनात अडकणार आहे. अशातच आयरा व नुपूर यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये दोघेही शाही पद्धतीने लग्न करणार असून त्यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी काही खास नियम बनवण्यात आले आहेत. 

आज म्हणजे ३ जानेवारी रोजी महाराष्ट्रीयन रितीरिवाजानुसार आयरा व नूपुर यांचे  लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या लग्नाला जवळचे काही खास कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. तथापि, या आयरा-नूपुर यांच्या लग्नात पाहुण्यांसाठी एक खास नियम असेल, जो परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांच्या लग्नातही होता. हा नियम नो-गिफ्ट पॉलिसी होय. आयरा-नूपुर यांच्या लग्नात पाहुणे उपस्थित राहणार आहेत. पण यांना लग्नासाठी काही आहेर न आणण्याचा नियम करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Ira Khan (@khan.ira)

आणखी वाचा – “मी तुम्हाला ओळखतो आणि…”, सोनू निगम यांनी कौतुक करताच भारावून गेले समीर चौघुले, म्हणाले, “हा क्षण माझ्यासाठी…”

आयरा-नुपूरच्या यांच्या या नियमामागे एक सुंदर विचार आहे. तो म्हणजे भेटवस्तूंऐवजी पाहुण्यांनी त्यांच्या संस्थेला देणगी देण्याची विनंती केली असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पिंकव्हिलाच्या वृत्तानुसार, आयराने लग्नात भेटवस्तू स्वीकारण्यास नकार दिला असून पाहुण्यांना भेटवस्तूंऐवजी आशीर्वाद व आगत्सू फाउंडेशनला देणगी द्यावी असे म्हटले आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते?’ मधील लोकप्रिय अभिनेत्रीचा साखरपुडा सोहळा संपन्न, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, पाहा काही खास फोटो

दरम्यान, आयरा-नूपुर हे आज म्हणजेच ३ जानेवारी रोजी वांद्रे येथील ताज लँड्स एंड या आलिशान हॉटेल शाही पध्दतीने विवाहबद्ध होणार आहेत. यानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दोन रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं आहे. यापैकी एक रिसेप्शन दिल्ली येथे तर दुसरे रिसेप्शन जयपूरमध्ये होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Tags: Amir Khan Latest Marathi NewsBollywood Celebrity Wedding Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare HaldiIra Khan-Nupur Shikhare Marriage Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare WeddingIra Khan-Nupur Shikhare Wedding Marathi NewsIra Khan-Nupur Shikhare Wedding PicturesIra Khan-Nupur Shikhare Wedding Videos PhotosKiran Rao Marathi NewsReena Dutt Marathi NewsWho is Nupur Shikhareअमीर खान ताज्या बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे लग्न बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाचे फोटोआयरा खान-नुपूर शिखरे लग्नाच्या बातम्याआयरा खान-नुपूर शिखरे वेडिंगआयरा खान-नुपूर शिखरे हळदीकिरण राव बातम्याकोण आहे नुपूर शिखरेबॉलिवूड सेलिब्रिटी लग्नाच्या मराठी बातम्यारीना दत्त बातम्या
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
marathi actor prathamesh parab and wife kshitija ghosalkar kelvan by family new video on instagram

फुलांच्या पायघड्या, आकर्षक सजावट, रोमॅंटिक डान्स अन्…; प्रथमेश-क्षितिजा यांच्या केळवणाचा अनोखा थाट, खास व्हिडीओ चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.