कलाक्षेत्रातील मंडळी खऱ्या आयुष्यात कोणाला डेट करतात हे जाणून घेण्यास चाहत्यांना अधिक रस असतो. काही कलाकार आपलं खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने बोलणं टाळतात. तर काही कलाकार आपल्या जोडीदाराबाबत खुलेपणाने व्यक्त होताना दिसतात. त्यामधीलच एक नाव म्हणजे पूजा सावंत. पूजा सोशल मीडियाद्वारे तिच्या आयुष्याबाबत काही गोष्टी चाहत्यांसह शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच पूजाने तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला. तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबरोबरचे फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर पूजाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. आता तिने होणाऱ्या नवऱ्यासह शेअर केलेला सुंदर व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
पूजाने तिचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाणसह फोटो शेअर करत लवकरच लग्न करणार असल्याचं सांगितलं. आता सिद्धेशने पूजाला प्रपोज केला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्षाअखेरीस पूजाने एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये सिद्धेश तिला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. सिद्धेश गुडघ्यावर बसून पूजा अंगठी घालतो.
आणखी वाचा – “ती गेली तेव्हा…”, आस्ताद काळेच्या आईचं निधन, अंगावर काटा आणणारी पोस्ट, म्हणाला, “अजूनही रडलो…”
पूजासाठी हे सारं काही स्वप्नवत होतं. सिद्धेशने तिला दिलेलं सरप्राइज पाहून पूजा रडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिने खूश होऊन होणाऱ्या नवऱ्याला मिठी मारली. यावेळी पूजाची बहिणही तिथे उपस्थित होती. तसेच मित्र—मंडळींनी पूजा-सिद्धेशचा हा खास क्षण आणखीनच स्पेशल केला. या व्हिडीओमध्ये दोघांचंही एकमेकांवर असलेलं प्रेम दिसून आलं.
आणखी वाचा – “मी रडत आहे…”, मुग्धा वैशंपायनला सासरच्या घरी गृहप्रवेश करताना पाहून बहीण भावुक, कमेंट करत म्हणाली…
पूजा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “परीकथांवर विश्वास ठेवणं मी बंद केलं होतं. मला असं वाटत होतं की, ‘’एक परिपूर्ण व्यक्ती” हे जगातील फक्त काल्पनिक विधान आहे. पण त्यानंतर मला सिद्धेश भेटला. माझ्याच परिकथेतला माझा मिस्टर परफेक्ट. मी आजा हा व्हिडीओ शेअर करत आहे. कारण फक्त २०२३मधीलच हा खास व्हिडीओ नव्हे तर माझं संपूर्ण आयुष्य १.२० मिनिटांच्या व्हिडीओमध्ये आहे. उत्साही, थोडी चिंताग्रस्तही आहे. पण मला काळजी करण्याची गरज नाही. कारण मला माहित आहे की, तू माझ्याबरोबरच आहेस. खूप प्रेम मिस्टर चव्हाण”. पूजाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.