शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘होणार सून…’नंतर तेजश्री प्रधानच्या गळ्यातील मंगळसूत्राची जोरदार चर्चा, युनिक डिझाइनने वेधलं लक्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 30, 2023 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Premachi Goshta Mukta Sagar Wedding

'होणार सून…’नंतर तेजश्री प्रधानच्या गळ्यातील मंगळसूत्राची जोरदार चर्चा, युनिक डिझाइनने वेधलं लक्ष

छोट्या पडद्यावरील मालिकांमधून कित्येक कलाकारांचे चेहरे नावारुपाला आले. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. मराठी मालिकांमध्ये तिने आजवर साकारलेल्या प्रत्येक भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. तिची ‘होणार सून मी या घरची’ मालिका तर विशेष गाजली. या मालिकेत तेजश्रीने साकारलेली जान्हवीची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेदरम्यान तेजश्रीच्या गळ्यातील मंगळसूत्राने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आताही असंच काहीसं घडलं आहे. तेजश्री सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेमधील तिचं मंगळसूत्र चर्चेचा विषय ठरत आहे. (Premachi Goshta Mukta Sagar Wedding)

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्री मुक्ता ही भूमिका साकारत आहे. मालिकेमध्ये आता मुक्ताचं सागरशी लग्न झालं आहे. मुक्ता-सागरच्या संगीत, हळद व लग्न समारंभातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मालिकेत अनेक ट्विस्ट आल्यानंतर अखेर मुक्ता-सागरचं लग्न पार पडलं. लग्नानंतर मुक्ताचा लूक कसा असणार? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते.

आणखी वाचा – शाहरुख खानच्या ‘मन्नत’मध्ये आहेत जागोजागी रोबोट्स, अभिनेत्याच्या सहकलाकाराचा खुलासा, म्हणाला, “घरामध्ये विमानतळासारखी…”

नुकतंच मालिकेचे १०० भाग पूर्ण झाले. यानिमित्त सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं. त्याचबरोबर प्रेक्षकांसह गप्पा मारण्यासाठी मालिकेतील सर्वच कलाकार इन्स्टाग्रामद्वारे लाइव्ह आले होते. या व्हिडिओमध्ये मुक्ताचा नवा लूक पाहायला मिळाला. या नव्या लूकमध्ये तिच्या मंगळसूत्राने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. मुक्ताच्या गळ्यातील हे मंगळसूत्र अगदी युनिक आहे. त्याचबरोबर तिने नेसलेली साडी लक्षवेधी ठरत आहे.

आणखी वाचा – “भारी उखाणा घेतला”, मुग्धा-प्रथमेशने गृहप्रवेशावेळी घेतलेल्या उखाण्यांना प्रेक्षकांची पसंती, सुकन्या मोने म्हणाल्या, “तुम्ही दोघांनी…”

याआधी तेजश्री ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील तिच्या मंगळसूत्रामुळे चर्चेत आली होती. त्या मालिकेतही तिच्या मंगळसूत्राने ट्रेंड सेट केला होता. तर आताही मुक्ताचं हे नवं मंगळसूत्र ट्रेंड सेट करेल असं म्हणायला हरकत नाही. या इन्स्टा लाईव्ह गप्पांमध्ये सागर, मुक्ता आणि नकारत्मक भूमिकेत पाहायला मिळणारी सावनी या तिघांचा ऑफस्क्रीन मैत्री किती छान आहे हे पाहायला मिळत आहे. ऑनस्क्रीन एकमेकांचा द्वेष करणारे हे तिघं सेटवर अगदी एकत्रित राहत असल्याचं पाहायला मिळालं.

Tags: entertainmentmarathi actressmarathi serialpremachi goshtastar pravahtejashri pradhan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Sankarshan Karhade Incident

"३०० रुपये चोरी केले अन्…", संकर्षण कऱ्हाडेने सांगितला चोरी पकडल्याचा किस्सा, म्हणाला, "आजोबांनी एक शिवी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.