शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२०२४ या आगामी वर्षात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी, ‘आश्रम’, ‘मिर्झापुर’सारख्या बहूचर्चित सीरिजचे येणार नवीन सीझन

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 29, 2023 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
aashram, mirzapur panchayat farzi webseries new season coming soon in 2024 year

२०२४ या आगामी वर्षात ओटीटीवर मनोरंजनाची मेजवानी, 'आश्रम', 'मिर्झापुर'सारख्या बहूचर्चित सीरिजचे येणार नवीन सीझन

२०२३ या वर्षात ओटीटीवर एकापेक्षा एक वेबसीरिज आल्या. हे वर्ष मनोरंजनाच्या बाबतीत खूपच मनोरंजक होते. अशातच येत्या नवीन वर्षात ‘मिर्झापूर ३’ पासून ‘आश्रम ४’ सारख्या अनेक लोकप्रिय वेबसीरिजचे सिकवेल्स प्रदर्शित होणार आहेत. तर जाणून घ्या येत्या नवीन वर्षात कोणत्या वेबसीरिज तुमच्या भेटीला येणार आहेत.

(१) मिर्झापूर : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजचे आतापर्यंत दोन सिझन रिलीज झाले आहेत. दोन्ही सीझन प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यामुळे आता या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच सीझन ३ हा येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

(२) द फॅमिली मॅन : मनोज बाजपेयी यांच्या ‘द फॅमिली मॅन’ने सर्वांनाच वेड लावले. मनोज वाजपेयी यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांना चकित केले. याचे आतापर्यंत दोन सीझन आले आहेत. दरम्यान, या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या भागात नवीन सीझनचे चाहूल पाहायला मिळाली होती. त्यामुळे या सीरिजचा तिसरा भाग पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. येत्या नवीन वर्षात हा नवीन सीझन येणार असल्याचे म्हटले जात आहे.

(३) पाताल लोक : ‘पाताल लोक’ या क्राईम थ्रिलर मालिकेचा पहिला सीझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. आता चाहते त्याच्या सीझन २ची वाट पाहत आहेत. येत्या नवीन वर्षात दूसरा सीझन येणार असल्याचे म्हटले जात आहे. पाताल लोक या वेबसीरिजला चाहत्यांनी खूपच लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे या नवीन सीझनसाठी चाहते उत्सुक आहेत.

(४) फर्जी  : ‘फर्जी’ ही २०२३ मधील सर्वोत्कृष्ट वेबसीरिजपैकी एक होती. या सीरिजद्वारे शाहिद कपूरने ओटीटीवर पदार्पण केले. या सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. अशातच आता या सीरिजचा दूसरा भाग नवीन वर्षात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अनेकांना याची आतुरता लागली आहे.

(५) आश्रम : बॉबी देओलसाठी २०२३ हे लाभदायी ठरले. यावर्षी बॉबी देओल हा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने खूप चर्चेत आला. यापूर्वी त्याची ‘आश्रम’ ही वेबसीरिज खूपच गाजली होती. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन आले असून येत्या नवीन वर्षात ‘आश्रम’चा चौथा सीझनही प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे येणारे नवीन वर्ष हे ओटीटी वापर कर्त्यांसाठी मनोरंजनाची चांगलीच पर्वणी असणार आहे. २०२४ मध्ये ‘आश्रम’, ‘पंचायत’, ‘फर्जी’, ‘द फॅमिली मॅन’सारख्या अनेक लोकप्रिय सीरिज प्रदर्शित होणार असल्यामुळे चाहते या सीरिजच्या नवीन सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत हे नक्की.

Tags: bollywood newsentertainmententertainment newsmirzapurott
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Karan Johar Answers To Trollers

"तिच्यासाठी एक सून घेऊन ये", ट्रोलर्सच्या कमेंटवर करण जोहरचं चोख उत्तर, म्हणाला, "'टाइमपाससाठी आईला सूनेची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.