रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिग्दर्शक साजिद खानचं निधन झाली असल्याची रंगली चर्चा, बातमी ऐकताच स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “मी अजूनही जिवंत आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 28, 2023 | 3:56 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Director Sajid Khan Video

दिग्दर्शक साजिद खानचं निधन झाली असल्याची रंगली चर्चा, बातमी ऐकताच स्वतःच केला खुलासा, म्हणाला, "मी अजूनही जिवंत आणि..."

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते साजिद खान यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले. दीर्घकाळ ते कर्करोगाशी झुंज देत होते. ‘मदर इंडिया’ या चित्रपटात साजिद यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करमध्ये नामांकनही मिळालं होतं. साजिद खान यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा समीर याने दिली. साजिद खान यांच्या निधनाची बातमी बुधवारी समोर आली. त्यानंतर काही लोकांना असे वाटू लागले की, दिग्दर्शक साजिद खान यांचे निधन झाले आहे. दोघांचे नाव एकच असल्यामुळे लोकांचा गैरसमज झाला होता. (Director Sajid Khan Video)

यावर स्वतः साजिद खान यांनी हा गैरसमज दूर केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. साजिद खानने व्हिडीओ शेअर करत सांगितले की, “ज्या व्यक्तीचे निधन झाले ते अभिनेते साजिद खान होते”. व्हिडीओ शेअर करताना साजिदने असं लिहिले आहे की, “RIP साजिद खान (१९५१ -२०२३ ) मी नाही. काही लोकांनी माझ्या फोटोसह हा संदेश दिला आहे”.

आणखी वाचा – “त्यांना गमावण्याचं दुःख…”, सैफ अली खानच्या घटस्फोटाबाबत १९ वर्षांनी आईचा मोठा खुलासा, शर्मिला म्हणाल्या, “आमच्यासाठी तो काळ…”

View this post on Instagram

A post shared by Sajid Khan (@aslisajidkhan)

प्रेक्षकांचा गैरसमज दूर करण्यासाठी साजिदने व्हिडीओ शेअर करत म्हटलं आहे की, “मी भूत आहे, मी साजिद खानचं भूत आहे. मी तुम्हा सर्वांना खावून टाकेन. माझ्या आत्म्याला शांती मिळत नाही. मला शांती कशी मिळेल? तो साजिद खान ७०च्या दशकातला होता. १९५७मध्ये आलेल्या ‘मदर इंडिया’मध्ये साजिद खानने साकारलेल्या लहान मुलाचे नाव सुनीत दत्त होते. त्यांचा जन्म १९५१ मध्ये झाला. माझा जन्म २० वर्षांनंतर झाला. त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. पण मीडियाच्या काही बेजबाबदार लोकांनी माझा फोटो पोस्ट केला आहे”.

आणखी वाचा – १४ वर्षांचा संसार, ९ वर्षांची मुलगी अन्…; मराठमोळी अभिनेत्री ईशा कोपीकरचा घटस्फोट, म्हणाली, “मला काही गोष्टी….”

साजिद पुढे म्हणाला, “काल रात्रीपासून मला लोकांकडून मेसेज येत आहेत, रेस्ट इन पीस. लोकांचे फोन येत आहेत की, तू जिवंत आहेस ना? अहो भाऊ, मी जिवंत आहे. तुमच्या प्रार्थनेमुळे मी मेलो नाही. म्हणून मी हात जोडून विनंती करतो की हा व्हिडीओ जो कोणी पाहत आहे तर मी जिवंत आहे. ईश्वर त्या साजिद खानच्या आत्म्याला शांती देवो” असंही साजिद खान म्हणाला आहे.

Tags: bollywood gosssipDirector Sajid Khan Videosajid khansajid khan director
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
marathi actor sankarshan karhade shared his fathers experience when he was ill

१०३ ताप, ढसाढसा रडलो अन्…; एका फोननंतर परभणीहून संकर्षण कऱ्हाडेच्या वडिलांनी लेकासाठी आणलं जेवण, म्हणाला, “ताकद नाही आणि…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.