‘बिग बॉस १७’ या शोमध्ये दिवसेंदिवस अधिकच घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अशातच या शोमध्ये नुकत्याच आलेल्या आयेश खानमुळे घरातील सगळे समीकरणे बदलली असल्याचे पाहायला मिळत आहे. वाइल्ड कार्ड म्हणून आलेल्या आयशा खानमुळे घरातील खेळाची दिशाच बदलली आहे. मुन्नवर फारुकी व मन्नारा चोप्रा यांच्यातील अंतर वाढले असून घरातील इंटर स्पर्धकांची आयेशाबद्दलची मतंही फारशी ठीक नाहीत. अशातच नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये आयशा व अंकिता लोखंडे यांच्यात जोरदार वाद झाल्याचे पहीला मिळाले.
अंकिता, आयेशा, ईशा मालवीय व समर्थ ही घरातील परिसरात सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात ईशा व समर्थ एकमेकांबरोबर बोलत असताना अंकिता आयेशाचे पाय खूप सुंदर असल्याचे कौतुक केले. यावर आयेशाने पुढचा मागचा विचार न करता अचानक तिला “मग चाटून बघ” असे अपमानास्पद उत्तर दिले. तिच्या या उत्तराने साहजिकच अंकिताचा राग अनावर झाला आणि त्यांच्यात जोरदार वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळाले.
#AnkitaLokhande: paanv kitne sundar ho rahe aapke
— DESI TOXIC (@DESITOXIC0007) December 27, 2023
Ayesha: chaat sakti hain aap (wtfffff even??)
Ankita: it’s totally disrespectful. Don’t cross ur line ????????????????????????#BB17 #BiggBoss17 pic.twitter.com/QOhrXSwanl
आयेशाच्या या अपमानास्पद उत्तरावर अंकिताला लगेचच राग आला आणि तिने तिच्याच शैलीत उत्तर देत असे म्हटले की, “आयेशा जर तुला नीट बोलायचे नसेल तर तसं सांग. अन्यथा असे फालतू बोलू नका. मर्यादा ओलांडू नको.” आयेशाच्या या वागण्याचा अंकितासह तिच्या अनेक चाहत्यांनादेखील राग आला आहे. चाहत्यांनी “अंकिता टीव्हीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे आणि आयेशा अंकिताशी असे बोलू शकत नाही” असं म्हणत आयेशावर कमेंट्सद्वारे निशाणा साधला आहे.
आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्यासह कोकणात पोहोचली गौतमी देशपांडे, माशांवर मारला ताव, साध्या लूकने वेधलं लक्ष
दरम्यान. ‘बिग बॉस’ हा शो आता हळूहळू अंतिम टप्प्यात आला असून या शोचे विजेतेपद पटकावण्यासाठी अनेकजण मेहनत करत आहेत. त्यामुळे घरातील प्रत्येक स्पर्धकांत संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शोमध्ये येताच आयेशा मुन्नवरचा पर्दाफाश करणार असल्याचे बोलली होती. पण ती आता त्याच्या जवळ येत असल्याचे पाहायला मिळत आहे.