रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

१४ वर्षांचा संसार, ९ वर्षांची मुलगी अन्…; मराठमोळी अभिनेत्री ईशा कोपीकरचा घटस्फोट, म्हणाली, “मला काही गोष्टी….”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 28, 2023 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Isha Koppikar Divorce

१४ वर्षांचा संसार, ९ वर्षांची मुलगी अन्...; मराठमोळी अभिनेत्री ईशा कोपीकरचा घटस्फोट, म्हणाली, "मला काही गोष्टी...."

बॉलिवूड सिनेसृष्टीमधून सध्या एकामागोमाग एक वाईट बातम्या कानावर येत आहेत. अशातच एका मराठमोळ्या व बॉलिवूड अभिनेत्रीच्या घटस्फोटाच्या बातमीने सगळ्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्री इशा कोप्पीकर बाबत खूप मोठा खुलासा समोर आला आहे. अभिनेत्री इशा कोप्पीकरने पती टिमी नारंगला घटस्फोट दिला असल्याचं समोर आलं आहे. एवढेच नाही तर तिने आपल्या मुलीसह घरही सोडले आहे. ४७ वर्षीय इशा कोप्पीकरने २००९ मध्ये व्यवसायाने हॉटेलियर असलेल्या टिमी नारंगशी लग्न केले. दोघांना नऊ वर्षांची मुलगीही आहे. (Isha Koppikar Divorce)

इशा व टिमीचे १४ वर्षांचे वैवाहिक आयुष्य संपलं आहे. लग्नाच्या १४ वर्षांनी दोघेही वेगळे झाले आहेत. नोव्हेंबर २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. इशा कोप्पीकरच्या चाहत्यांसाठी ही बातमी खूपच धक्कादायक आहे. इशा व टिमी नारंग त्यांच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी होते. मात्र काही काळापासून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. सूत्रांनी ETimes ला सांगितले की, “इशा व टिमी नारंग वेगळे झाले आहेत कारण त्यांच्यात आवड सुरु होते. दोघांनी लग्न वाचवण्यासाठी , मुलीसाठी एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केले; पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही” असं समोर आलं आहे.

आणखी वाचा – “ढगाला लागली कळ…”, बदलापूर कॉन्सर्टमध्ये नेहा कक्करच्या नवऱ्याने गायलं मराठी गाणं, प्रेक्षकही चक्रावले, बायको म्हणाली, “या क्षणाची…”

सूत्राने सांगितले की,”इशा व टिमी नारंग यांनी त्यांचे लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ते साध्य झालं नाही. अखेर त्यांचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटानंतर इशा कोप्पीकरने आपल्या मुलीसह घर सोडले. आता ती वेगळ्या ठिकाणी राहत आहे” असं सांगण्यात आलं. याबाबत इशा कोप्पीकरसह ‘इटाइम्स’ने संपर्क साधला असता ती म्हणाली, “काहीही सांगण्यासारखे राहिले नाही. आता काही घाईत बोलणं चुकीचं ठरेल. मला काही गोष्टी आता समोर आणायच्या नाहीत”.

आणखी वाचा – लग्नानंतर नवऱ्यासह कोकणात पोहोचली गौतमी देशपांडे, माशांवर मारला ताव, साध्या लूकने वेधलं लक्ष

ईशा कोप्पीकर व टिमी नारंग यांची पहिली भेट एका जिममध्ये झाली. त्यानंतर ते दोघे प्रेमात पडले. एकमेकांना डेट करण्यापूर्वी इशा व टिमी तीन वर्षे मित्र होते. २००९ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर इशा सिनेसृष्टीपासून दूर गेली आणि तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. ‘एक था दिल एक थी धडकन’ या चित्रपटातून अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनतर अभिनेत्रीने ‘फिजा’, ‘प्यार इश्क और मोहब्बत’, ‘कंपनी’, ‘कांटे’, ‘डॉन’, ‘क्या कुल हैं हम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

Tags: bollywood gossipentertainmentisha koppikarisha koppikar divorceisha koppikar husband
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Sharmila Tagore And Saif Ali Khan

"त्यांना गमावण्याचं दुःख…", सैफ अली खानच्या घटस्फोटाबाबत १९ वर्षांनी आईचा मोठा खुलासा, शर्मिला म्हणाल्या, "आमच्यासाठी तो काळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.