अभिनेत्री, गायिका स्वानंदी टीकेकर व गायक आशिष कुलकर्णी हे दोघेही नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. गेले काही दिवस सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. गेले काही दिवस त्यांच्या केळवण, हळदी व संगीत सोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. तेव्हापासून चाहत्यांना त्यांच्या लग्नाची आतुरता लागली होती आणि अखेरीस ही जोडी विवाहबंधनात अडकली आहे. अगदी साध्या व पारंपरिक अंदाजात त्यांनी एकमेकांबरोबर विवाहगाठ बांधली. (Swanandi Tikekar And Ashish Kulkarni On Instagram)
स्वानंदी-आशिष यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. त्यांच्या लग्नाच्या फोटो व व्हिडीओवर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. स्वानंदीने लग्नात गुलाबी रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. तर आशिषने लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा कुर्ता व त्यावर स्वानंदीच्या साडीला साजेसा असा धोतर परिधान केला होता. अंत्यत पारंपरिक व आकर्षक अशा दोघांचा लग्नाचा लूक चाहत्यांनाही विशेष भावला. त्याचबरोबर लग्नातील साधेपणाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
अशातच स्वानंदी-आशिषने त्यांच्या रिसेप्शन लूकमधील एक शेअर केला आहे. “मी माझी प्रेमकथा तुझ्यामध्ये शोधली” असं म्हणत स्वानंदीने हा फोटो शेअर केला आहे. तसेच या पुढे तिने आशिषला टॅगही केले आहे. रिसेप्शनच्या लूकसाठी दोघांनी खास लूक केला होता. या लूकसाठी स्वानंदीने लाल रंगाची सुंदर नक्षीकाम असलेली साडी परिधान केली होती. गळ्यात हिरव्या रंगाचा सुंदर नेकलेस परिधान केला होता. तर आशिषने काळ्या रंगाची पठाणी कोट परिधान केला असून त्यावर एका बाजुने सुंदर नक्षीकाम असलेली शाल परिधान केली आहे.
आणखी वाचा – “वेदना, झोप नाही अन्…”, गरोदरपणानंतर सई लोकूरची झाली आहे अशी अवस्था, म्हणाली, “घाण डायपर…”
दरम्यान, स्वानंदी-आशिष यांनी शेअर केलेल्या या फोटोला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. सुरुची अडारकर, संचित चौधरी, आरती मोरे यांसह स्वानंदीचे वडिल व अभिनेते उदय टीकेकर यांनीही कमेंट केली आहे. अनेकांनी कमेंट्सद्वारे त्यांना त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले आहेत. तसेच “खूप छान, खूप गोड दिसत आहात, शुभेच्छा, अभिनंदन” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.