अभिनेता रणबीर कपूर हा ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. तसेच अभिनेत्री आलिया हेदेखील तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. अशातच ही जोडी आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे आणि या चर्चेचं मुख्य कारण म्हणजे त्यांची मुलगी राहा. रणबीर-आलिया यांच्या मुलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओद्वारे त्यांनी राहाची पहिल्यांदाच ओळख करुन दिली आहे. अल्पावधीतच या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसादही दिला आहे. (Raha Face Reveled)
रणबीर-आलिया या जोडीने १४ एप्रिल २०२२ रोजी लग्नगाठ बांधली होती. यानंतर आलियाने ५ नोव्हेंबरला तिच्या लेकीला जन्म दिला. गेल्याच महिन्यात आलियाने राहाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. गेले वर्षभर आलियाने लेकीचा कोणताच फोटो शेअर केला नव्हता. त्यामुळे त्यांच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या दोघांनीही त्यांच्या चाहत्यांनी राहाचा चेहरा दाखवण्याची विनंतीही केली. मात्र, आलियाने योग्य वेळ आल्यावर ती आपल्या मुलीची मीडिया व जगासमोर ओळख करून देणार असल्याचे सांगितले होते आणि अशातच नवीन वर्षाच्या व ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर-आलियाने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.
सोशल मीडियावर राहाच्या पहिल्या लूकचे अनेक फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये राहा गुलाबी स्कर्ट व पांढऱ्या टॉपमध्ये दिसत आहे. या ड्रेसखाली तिने लाल रंगाचे शूजदेखील परिधान केले आहेत. त्याचबरोबर केसांच्या दोन वेण्यांमध्ये राहा खूपच गोंडस दिसत आहे. रणबीर-आलिया यांनी राहाला आपल्या हातांवर उचलत कॅमेऱ्यासमोर पोजेस दिल्या आहेत. तसेच या व्हायरल व्हिडीओमध्ये राहाचा क्युट अंदाज दिसत आहे.
आणखी वाचा – बहिणीची लग्नगाठ बांधताना मृण्मयीने घेतला खास उखाणा, म्हणाली, “आयुष्यभरासाठी बांधली…”
या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. व्हिडीओखाली कमेंट्समध्य नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये राहाला आलिया भट्टची कॉपी म्हटलं आहे, तर काही जण ती तिचे आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे म्हटले आहे. तर आणखी एकाने राहा रणबीर कपूरसारखी दिसत नसल्याचेही म्हटले आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली राहाच्या सुंदर डोळ्यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, राहामुळे अनेकांना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.