रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Dunki Review : शाहरुख खानचा ‘डंकी’ पाहावा की नाही?, पहिला Review समोर, प्रेक्षक म्हणाले, “‘जवान’, ‘पठाण’पेक्षा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 21, 2023 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Dunki Movie Review in Marathi

डंकी मूवी रिव्यू

Shah Rukh Khan Dunki Movie Review : शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांच्या ‘डंकी’ चित्रपटाने सर्वत्र हवा केली आहे. हा चित्रपट आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रदर्शित करण्यात आला आहे. जानेवारीमध्ये ‘पठाण’ आणि सप्टेंबरमध्ये ‘जवान’ चित्रपटानंतर लगेचच शाहरुख खानचा या वर्षातील तिसरा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा पहिला शो मुंबईच्या प्रतिष्ठित सिंगल स्क्रीन थिएटर येथे सकाळी ५.५५ वाजता सुरु करण्यात आला. शाहरुख खानच्या चाहत्यांना खात्री आहे की, त्याचा हा नवा सिनेमाही ब्लॉकबस्टर ठरेल.

शाहरुखच्या चाहत्यांनी केलेल्या चित्रपटाच्या ओपनिंगचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शाहरुख खानच्या फॅन क्लबने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, चाहत्यांनी अक्षरशः ढोल ताश्यांच्या गजरात चित्रपटाचं स्वागत केलं. चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या प्रेमाने व उत्साहाने भारावून गेलेल्या, शाहरुखने ट्विटरवरुन खास पोस्ट शेअर केली. “धन्यवाद मित्रांनो व मैत्रिणींनो. हा खूप चांगला चित्रपट आहे. आशा आहे की ‘डंकी’द्वारे तुम्हा सर्वांचे मनोरंजन होईल” अशा आशयाची पोस्ट शाहरुखने चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

आणखी वाचा – रुग्णालयामधून घरी परतला श्रेयस तळपदे, बायकोची भावुक पोस्ट, म्हणाली, “त्या संध्याकाळी तो माझ्याबरोबर…”

डंकी’चे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून त्यात तापसी पन्नू, विकी कौशल व बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत. डंकी चित्रपटाचे लेखन अभिजात जोशी, राजकुमार हिरानी व कनिका धिल्लन यांनी केले आहे. मनू, सुखी, बुग्गू व बल्ली या चार मित्रांची हृदयस्पर्शी कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by DUNKI FILM (@dunki_movie_)

आणखी वाचा – आधी बोलावलं नाही म्हणून रुसली, आता सई ताम्हणकरच्या नव्या घरी पोहोचली सोनाली कुलकर्णी, बाल्कनीमधील फोटो व्हायरल

डंकी चित्रपट पाहून प्रेक्षकांनी चित्रपटाचं भरभरून कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे. एका युजरने चित्रपट पाहिल्यावर कमेंट करत, “काय चित्रपट आहे. मला चित्रपट खूप आवडला. राजकुमार हिरानी, ​​धन्यवाद, शाहरुख खानला माझ्यासारख्या जुन्या चाहत्यांसाठी परत आणल्याबद्दल” अशी कमेंट केली आहे. तर काहींनी ‘पठाण’ व ‘जवान’ पेक्षा उत्तम कलाकृती असल्याचं म्हटलं आहे. कॉमेडियन सुनील पाल हे देखील शाहरुख खानचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी देखील डंकी चित्रपटाचा पहिला शो चित्रपटगृहात जाऊन पाहिला. चित्रपट पाहिल्यावर ते म्हणाले की, “डंकी हा चित्रपट २,००० कोटी रुपयांची कमाई करणार. गमतीत ते असंही म्हणाले की, “जादुगार हिरानीसाठी एक हजार कोटी आणि बाजीगर शाहरुख खानसाठी एक हजार कोटी”असंही ते म्हणाले.

Tags: Dunki First Review in MarathiDunki Review in MarathientertainmentShah Rukh Khan Dunki Review in Marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
satvya mulichi satavi mulgi serial new promo video viral on social media

अखेर रुपालीचं सत्य अव्दैतला कळणार?, ‘सातव्या मुलीची..." मालिकेत मोठा ट्विस्ट, प्रोमोने वाढवली उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.