गेले काही दिवस रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरू आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या चित्रपटाने कमाईचे सगळेच रेकॉर्डसदेखील मोडले आहेत. परंतु, चित्रपटात दाखवण्यात आलेल्या हिंसाचार व काही दृश्यांवर अनेक् समीक्षकांनी टीकाहे केली आहे. वेगवेगळ्या स्तरातून या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळत आहे. कलाविश्वापासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत आणि जाणकारांपासून ते अगदी सामान्य प्रेक्षकांपर्यंत साऱ्यांनीच यावर आपली मतं व्यक्त केली आहेत. (Arshad Warsi Talk On Animal Movie)
अशातच बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने या चित्रपटाबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. अर्शदने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे अॅनिमल या चित्रपटाविषयीचे मत मांडले. यावेळी तो असं म्हणाला की, “सर्व गंभीर कलाकारांना या चित्रपटाचा तिरस्कार वाटला. पण मला मात्र हा चित्रपट आवडला. मी कोणत्याही चित्रपटाकडे मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून बघतो. लोकांना काही सल्ले, उपदेश किंवा शिकवण्याची माझी अजिबात इच्छा नाही. चित्रपट हे फक्त मनोरंजनापुरतेच असते. त्यामुळे त्याच्याकडे फक्त मनोरंजन म्हणूनच पाहिले पाहिजे.”
यापुढे त्याने असे म्हटले आहे की, “मी अॅनिमलसारख्या चित्रपटाचा कधीही भाग होणार नाही. कारण मला इतकी हिंसा किंवा अॅक्शन आवडत नाही. मला अॅक्शन ही पडद्यावर पाहायला आवडते. पण ते प्रत्यक्षात करायला आवडत नाही. त्यामुळे एक प्रेक्षक म्हणून मला जे बघायला आवडते. टेक एक एक अभिनेता म्हणून मला ते कधीही करायचे नाही. मला पॉर्न आवडते. पण मला ते करायचे नाही. “
आणखी वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचे चित्रपटात पदार्पण, लवकरच झळकणार मोठ्या पडदयावर, फोटो शेअर करत म्हणाली…
दरम्यान, मुन्नाभाई एम.बी.बी.एस. लोकप्रिय चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “२० वर्षे… हे अगदी कालच झाल्यासारखे वाटले. मुन्ना व सर्किटवर इतके प्रेम केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो.” असं म्हणत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. तसेच अर्शद लवकरच ‘वेलकम टु जंगल’ या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.