स्टार प्रवाह वरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेला खूप लोकप्रियता मिळाली. ही मालिका गेल्या ३ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. या मालिकेने टीआरपीचेही अनेक रेकॉर्ड मोडले होते. या मालिकेने बराच काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण आजही या मालिकेचे अनेक चाहते आहेत. (Anagha Atul On Instagram)
मालिकेतील कलाकार मंडळी आजही चर्चेत असतात. सोशल मीडियाद्वारे ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच या मालिकेतील एक अभिनेत्री लवकरच चित्रपटात झळकणार असल्याचे कळत आहे. अभिनेत्रीने स्वत: तिच्या सोशल मीडियाद्वारे ही आनंदाची बातमी तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत ती लवकरच चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत श्वेता ही भूमिका साकारणारी अभिनेती अनघा अतुल लवकरच चित्रपटातून पदार्पण करणार आहे. यासंदर्भात तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये चित्रपटांची स्क्रिप्ट (संहिता) व आजूबाजूला शूटिंगचे वातावरण दिसत आहे. तसेच या फोटोवर अनघाने “मुव्ही टाइम, लवकरच, गणपती बाप्पा मोरया.” असं म्हटलं आहे. त्यामुळे छोटा पडद्यावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर अनघा लवकरच मोठ्या पडद्यावर अभियाणी करण्यासाठी सज्ज झाली आहे.
आणखी वाचा – “नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…”, पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ
दरम्यान, अनघा कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? हा चित्रपट हिंदी आहे की मराठी आहे? या चित्रपटातील तिची नेमकी भूमिका काय आहे? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. अभिनेत्रीने तिच्या या नवीन चित्रपटाबद्दल व तिच्या भूमिकेबद्दल काहीही माहिती सांगितली नाही. त्यामुळे चाहत्यांना तिच्या या नवीन प्रोजेक्टबद्दल उत्सुकता लागली आहे. तिचे अनेक चाहते तिला मोठ्या पडदयावर पाहण्यासाठी आतुर आहेत.