सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुग्धा वैशंपायनला लागली प्रथमेश लघाटेच्या नावाची हळद, घरी नातेवाईकांची गर्दी, धमाल-मस्ती अन्…; सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 20, 2023 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
mugdha vaishampayan and prathamesh laghate shared haladi photos on social media

मुग्धा वैशंपायनला लागली प्रथमेश लघाटेच्या नावाची हळद, घरी नातेवाईकांची गर्दी, धमाल-मस्ती अन्...; सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मराठी मनोरंजनसृष्टीमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. मनोरंजन विश्वातील प्रसाद जवादे व अमृता देशमुख, सुरुची अडारकार व पियूष रानडे या जोड्या नुकत्याच विवाहबंधनात अडकल्या. नुकतंच ‘सारेगमप’ लिटिल चॅम्प्समधील गायिका मुग्धा वैशंपायनच्या मोठ्या बहिणीचे लग्नदेखील पार पडले. या लग्नाच्या तयारीमध्ये मुग्धा चांगलीच व्यस्त होती. ताईच्या हळदीचे, मेहंदीचे, ग्रहमख, लग्नाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत होती. अशातच आता तिच्या लग्नाचीही तयारी सुरू झाली आहे. (Mugdha Vaishampayan On Instagram)

ताईच्या लग्नानंतर आता मुग्धाच्या लग्नालाही सुरुवात झाली आहे. मुग्धाने नुकतेच तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या अंगाला हळद लागली असल्याचे दिसत आहे. यावरून त्यांच्या लग्नाआधीच्या विधीना सुरुवात झाली आहे. “हरिद्रा लापन । घाणा भरणे” असं कॅप्शन देत तिने तिच्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. मुग्धाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या चेहऱ्यावर आनंद खुलून दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर लग्नाचे तेज दिसून येत आहे.  

View this post on Instagram

A post shared by Mugdha Bhagawan Vaishampayan (@mugdhabhagawan5)

आणखी वाचा – “नवीन आयुष्य, लावूया नवीन रोप…”, पियूष रानडेचा बायकोसाठी खास उखाणा, पाहा खास व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी मुग्धा व प्रथमेश यांनी सोशल मीडियावरून दोघांचा एकत्र फोटो शेअर करत ‘आमचं ठरलं’ असं म्हणत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. तेव्हापासून मुग्धा व प्रथमेश यांच्या लग्नाकडे साऱ्यांचचं लक्ष लागून राहिलं आहे. मुग्धा व प्रथमेश यांच्या केळवणाचेही बरेच फोटो समोर आले. मुग्धा व प्रथमेश सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या लग्नाच्या आधीच्या प्रत्येक विधीचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आणखी वाचा – “मी आता थोडा…”, हृदयविकाराच्या झटक्यानंतर पाच दिवसांनी स्वतः श्रेयस तळपदेने दिली हेल्थ अपडेट, म्हणाला, “तुमच्या प्रार्थनांमुळे….”

प्रथमेशनेही त्याच्या सोशल मीडियाद्वारे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अशातच आता त्यांचा हळदीचा एक फोटो समोर आला आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान गेले काही दिवस त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु होती. अशातच या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच त्यांचे अनेक चाहते मंडळी या लग्नासाठी आतुर आहेत.

Tags: entertainmententertainment newsMarathi newsmarathi singermugdha prathameshmugdha vaishampayanprathamesh laghateprathamesh laghate and mugdha vaishampayan wedding
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kokan Hearted Girl Video
Social

कोकणची माणसं खरंच साधीभोळी; अंकिता वालावलकरने जास्वंद विकणाऱ्या काकांचं शूट करत पटवून दिलं, पैशांचा विचार न करता…

मे 12, 2025 | 5:56 pm
Martyr surendra mogas wife emotional
Women

Video : “उठ ना यार, आय लव्ह यू रे”, शहीद पतीला अखेरचं पाहताना पत्नीचा आक्रोश, चेहऱ्यावर हात फिरवत राहिली अन्…

मे 12, 2025 | 5:42 pm
Anushka sharma on virat kohli retirement
Entertainment

“तुझे अश्रू, तुझा संघर्ष कोणीच न पाहता…”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पहिली प्रतिक्रिया, भावुक झाली अन्…

मे 12, 2025 | 4:50 pm
Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Next Post
Kangana Ranaut Loksabha Election 2024

अखेर ठरलं ! २०२४ मध्ये भाजपाकडून कंगना रणौत लढणार निवडणूक, अभिनेत्रीच्या वडिलांनीच केला खुलासा, म्हणाले…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.