Bigg Boss 17 Latest News : ‘बिग बॉस १७’ हा शो सध्या विशेष चर्चेत आला आहे. कलाकारांची भांडण या शोला एका उंचीवर घेऊन जात आहेत. अंतिम टप्प्यात हा शो आल्यानंतर स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु असलेली पाहायला मिळत आहे. विक्की जैन व नील यांचं जोरदार भांडण सध्या पाहायला मिळत आहे. त्यांच्या या भांडणात ऐश्वर्या शर्मा मध्ये पडते. यावर ऐश्वर्याच्या एंट्रीनंतर अंकिता एक वाक्य बोलते. ते ऐकून ऐश्वर्या व अंकिता यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडते. या भांडणात ऐश्वर्या अंकिताला ‘तुझ्यासारखी स्त्री’ असं म्हणते आणि अंकिता या वाक्याला धरुन तिच्याशी लढाई सुरुचं ठेवते.
विकी जैन व नील यांचं जोरदार भांडण सुरु असत, तेव्हा विकी निलला म्हणतो, ‘तू तिच्यावर नियंत्रण ठेव’ यावर ऐश्वर्या ओरडते आणि विकीशी भांडायला पुढे सरकते. विकीला ती म्हणते की, ‘तू माझ्यावर नियंत्रण ठेवणार? तर दुसरीकडे, अंकिता म्हणते की, ‘नीलने ऐश्वर्याची काळजी घ्यावी’ हे ऐकून ऐश्वर्याचे लक्ष अंकिताकडे वळते.
त्यानंतर ऐश्वर्या व अंकिता यांच्यात कडाक्याचं भांडण सुरु होतं. ऐश्वर्या अंकिताजवळ येत तिला बोलते, ‘काय बोललीस खोटी बाई?, स्वतःवर नियंत्रण ठेव’. यावर अंकिताही शांत न बसता उत्तर देते, ‘काय करणार?, तुझा नवरा आल्यापासून माझ्या मागे लागला आहे’. हे ऐकून ऐश्वर्या रागात म्हणते की, ‘माझ्या नवऱ्याला तुझ्यासारख्या स्त्रीमध्ये रस नाही’ यावर अंकिता नाराज होऊन ऐश्वर्याला खडेबोल सुनावत म्हणते की, ‘तुझ्यासारख्या स्त्रीला म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचे आहे?’
कलर्सच्या ऑफिशिअल पेजवरून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. दरम्यान विकी-अंकिता, निल-ऐश्वर्या यांच्यातील भांडण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी स्पर्धकांना ट्रोल करायला सुरुवात केलेली पाहायला मिळत आहे.