छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेला कलाकार म्हणजे शिव ठाकरे. ‘बिग बॉस’च्या १६व्या पर्वामुळे शिव अवघ्या देशभरात प्रसिद्ध झाला. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता झाल्यानंतर त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली. परंतु, हिंदी ‘बिग बॉस’मुळे तो खूपच प्रसिद्धी झोतात आला. शिव हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याचा एक नवीन व्हिडीओ व्हायरल होत आहे. (Shiv Thakare Video)
‘बिग बॉस’मुळे शिवला ‘आपला माणूस’ ही नवी ओळख मिळाली. प्रेक्षकांचा लाडका ‘आपला माणूस’ आता ‘झलक दिखला जा’च्या नवीन पर्वात सहभागी झाला आहे. याच शोच्या निमित्ताने शिवची आई त्याला खास सरप्राइज देण्यासाठी थेट ‘झलक दिख ला जा’च्या सेटवर पोहोचली आहे. शिवची आई त्याला भेटण्यासाठी बुरखा घालून सेटवर गेली असल्याचे पाहायला मिळाले. आईला अचानक सेटवर पाहून शिवही आश्चर्यचकित झाला. आईला सेटवर पाहून त्यालाही भलताच आनंद झाला.
शिवची आई लेकाचा डान्स पाहण्यासाठी ‘झलक दिख ला जा’च्या सेटवर पोहोचली. तेव्हा त्यांच्या साध्याभोळ्या स्वभावाने त्यांनी पापाराझींची मनं जिंकली. शिवच्या आईने पापराझींला “राम राम”, “ओम शांती” म्हणत त्यांना हात जोडले. तसेच त्यांनी पापराझींची विचारपूसही केली. त्यांची ही कृती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. तसंच त्यांचं कौतुकही होत आहे.
दरम्यान, इन्स्टाग्रामसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्स करत पसंती दर्शवली आहे. खुप छान, शिव हा त्याच्यासारखाच आहे, शिववर त्याच्या आईचे चांगले संस्कार आहेत, शिव हा अगदी आईवेडा आहे, खूप छान व्हिडीओ आहे” अशा अनेक कमेंट्स करत या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे. तसेच शिवाची आईला ‘झलक दिख ला जा’च्या आगामी भागांसाठी उत्सुक असल्याचेदेखील सांगितले आहे.