शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“ते हवे होते कारण…”, ऋषी कपूर यांच्या आठवणीत शक्ती कपूर भावुक, म्हणाले, “माझ्या कुटुंबाचे संबंध…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 12, 2023 | 5:18 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actor shakti kapoor praised ranbir the success of animal and remembered his late father

"ते हवे होते कारण...", ऋषी कपूर यांच्या आठवणीत शक्ती कपूर भावुक, म्हणाले, "माझ्या कुटुंबाचे संबंध..."

बॉलिवूडमध्ये अनेक विविधांगी भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे एक कलाकार म्हणजे अभिनेते शक्ती कपूर. त्यांनी आजवर गंभीर, विनोदी, नकारात्मक तसेच सकारात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. सध्या त्यांची ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटातील भूमिकादेखील लक्षवेधी ठरत आहे. ‘अ‍ॅनिमल’मध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक आहे. अशातच त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत रणबीर कपूरचे कौतुक करत त्याचे वडील ऋषी कपूर यांच्या काही खास आठवणींना उजाळा दिला आहे.   

यावेळी त्यांना “चित्रपटाला आता भरघोस यश मिळत आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्यांनी असे म्हटले की, “चित्रपटाला मिळणारे यश हे मला खूपच आश्चर्यचकित करणारे आहे. दिग्दर्शकाने चित्रपटाची कथा ऐकवताच चित्रपटाला यश मिळणार हे माहीत झाले होते. पण संपूर्ण जगभरातून इतका प्रतिसाद मिळेल याची अपेक्षा नव्हती.” यापुढे त्यांना “तुम्ही एकत्र कुटुंबाने मिळून हा चित्रपट बघितला आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर “श्रद्धा सध्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि माझी पत्नी यावेळी बाहेर आहे. त्यामुळे आम्ही अजून एकत्र चित्रपट बघितला नाही.  पण लवकरच आम्ही चित्रपट बघणार असल्याचे त्यांनी सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Shakti Kapoor (@shaktikapoor)

आणखी वाचा – “नवऱ्याबरोबर ‘बिग बॉस’मध्ये जाऊ नकोस”, चाहतीने सल्ला देताच सोनाली कुलकर्णीचे उत्तर, म्हणाली, “तिथे कधीच…”

यापुढे त्यांना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दलचा एक प्रश्न विचारण्यात आला. “ऋषी कपूर व तुमचे संबंध अधिक जवळचे होते. त्यांच्याबरोबर तुमचे कौटुंबिक नाते होते, तर ऋषी कपूर व रणबीर कपूर या बापलेकाच्या नात्याबद्दल काय सांगाल?” असे विचारण्यात आले. याचे उत्तर देत ते असं म्हणाले की, “ऋषी माझ्यापेक्षा एका दिवसाने लहान होता. त्याच्या मुलाशी त्याचे नाते अगदीच छान होते. त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्याच्या व माझ्या कुटुंबाचे संबंधदेखील खूपच खास होते. मुलांच्या लहानपणी आम्ही दोन्ही कुटुंबं एकत्र फिरायला जायचो. आता रणबीरने मिळवलेले हे यश पाहण्यासाठी ऋषी आता हवा होता. त्याला रणबीरचा नक्कीच अभिमान वाटला असता.”

आणखी वाचा – ‘लूट पुट गया’नंतर ‘डंकी’च्या दुसऱ्या गाण्याची चर्चा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुख खानने सांगितला चित्रपटाच्या नावाचा अर्थ

दरम्यान, रणबीर कपूर, बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटात शक्ती कपूर यांनीदेखील त्यांच्या अभिनयाचा वेगळाच ठसा उमटवला आहे. तसेच रणबीर हा सध्याच्या कलाकारांपैकी माझा अत्यंत आवडता अभिनेता आहे आणि त्याचा मला खूपच अभिमान आहे असं म्हणत अभिनेत्याचं कौतुक केलं आहे.  

Tags: bollywood actorbollywood newsranbir kapoorshakti kapoor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
lin laishram dance with randeep hooda

Video : रिसेप्शन पार्टीत रणदीप हुड्डाच्या बायकोचा भन्नाट डान्स, पारंपरिक लूकमध्ये दिसली अन्…; व्हिडीओ चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.