रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात वैवाहिक बलात्काराच्या सीनवरुन होणाऱ्या चर्चांवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, “मला संकोच वाटत नव्हता पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 11, 2023 | 10:53 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Bobby Deol On Marital Rape Seen In Animal

‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात वैवाहिक बलात्काराच्या सीनवरुन होणाऱ्या चर्चांवर बॉबी देओलने सोडलं मौन, म्हणाला, "मला संकोच वाटत नव्हता पण…"

नुकताच प्रदर्शित झालेला ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. दरम्यान अभिनेता बॉबी देओलच्या धाडसी भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. बॉबीने चित्रपटात अबरार या मूक पात्राची भूमिका साकारली आहे. त्याच्या चित्रपटातील या अभिनयाचे भरपूर कौतुक होत असतानाच, या चित्रपटातील त्याच्या वैवाहिक बलात्काराच्या दृश्याबाबत बरेच वादही समोर आले आहेत. या दृश्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान एका मुलाखतीत बॉबीने यावर मौन सोडले असल्याचं पाहायला मिळत आहे. (Bobby Deol On Marital Rape Seen In Animal)

‘अ‍ॅनिमल’मधील बॉबी देओलच्या वैवाहिक बलात्काराच्या सीनवरून बराच वाद सुरू आहे. यासंदर्भात ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बॉबीने सांगितले की, “हा सीन चित्रित करताना मला कोणताही संकोच वाटला नाही”. बॉबी पुढे म्हणाला. “ज्या क्षणापासून मी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल ऐकले, तेव्हापासून मला माहित होते की मी एक शब्दही न बोलता त्यात बरेच काही करू शकतो. प्रत्यक्षात, एकही शब्द न बोलता, मला एक प्रकारची ऊर्जा मिळाली ज्यामुळे माझ्यातील काहीतरी बाहेर आले. जेव्हा मी अभिनय करत होतो, तेव्हा मला कोणत्याही प्रकारचा संकोच वाटत नव्हता” असंही तो म्हणाला.

आणखी वाचा – “दारु खूप जास्त झाली”, भर कार्यक्रमात अजिंक्य देव यांनी ओढली सिगारेट, व्हिडीओ पाहताच नेटकरी भडकले, म्हणाले, “वडिलांनी कमावलं ते मुलाने…”

त्याच्या या चित्रपटातील ग्रे शेडबद्दल बोलताना, बॉबीने स्पष्ट केले की, “मी केवळ हे पात्र साकारत होतो, जे पात्र क्रूर आहे, ते पात्र एक दुष्ट माणूस आहे आणि तो आपल्या स्त्रियांशी असे वागतो, कारण ते पात्र असंच आहे. मात्र तो त्याच्या तीन बायकांसह खरोखर रोमँटिक आहे” असंही तो म्हणाला.

आणखी वाचा – मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मुग्धा वैशंपायन लवकरच अडकणार विवाहबंधनात; ‘ब्राईड टू बी’ पार्टीच्या फोटोंनी वेधलं लक्ष

‘अ‍ॅनिमल’च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या अवघ्या १० दिवसांत ४३० कोटींहून अधिक कमाई केली आहे. त्याचबरोबर ‘अ‍ॅनिमल’ने जगभरात ६६० कोटींहून अधिकचा व्यवसाय केला असून आता तो ७०० कोटींचा आकडा पार करण्याच्या मार्गावर आहे.

Tags: animalanimal moviebobby deolbobby deol on animalBobby Deol On Marital Rape Seen
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
dancer and actress mukti mohan just married with animal fame actor kunal thakur photos viral on social media

अभिनेत्री व नृत्यांगना मुक्ती मोहनचा विवाहसोहळा संपन्न, 'अ‍ॅनिमल' फेम 'या' अभिनेत्याबरोबर केलं लग्न, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.