नांदा सौख्य भरे या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋतुजा बागवे. ऋतुजाने आजवर अनेक मराठी नाटक, मालिका व चित्रपटांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ऋतुजा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिने हा खास व्हिडीओ शेअर केला आहे. (Rutuja Bagwe On Instagram)
ऋतुजाचा नुकताच ‘लंडन मिसळ’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि नायिका म्हणून हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी खास असल्याचे तिने याआधी अनेकदा म्हटले आहे. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “काल मी स्वत:ला प्रथमच एका मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत पहिलं. नकाराला मी घाबरत नाही किंवा नकार मी मनालाही लावून घेत नाही. पण एका चित्रपटाला मिळालेला नकार आणि मग आपण चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्यास सक्षम नाही का? अशी माझ्या मनात शंका निर्माण झाली. मुख्य भूमिकेत दिसणं हे खरंतर माझं स्वप्न कधीच नव्हतं. पण आपण चित्रपटाची नायिका होऊ शकत नाही. ह्याची जाणीव करुन दिल्यावर मात्र माझ्या स्वभावानुसार मनात आलं की हे करायलाच हवं”
आणखी वाचा – ‘अॅनिमल’ पाठोपाठ रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र २’ या चित्रपटाची चर्चा, रणवीर सिंहची एण्ट्री अन्…
यापुढे तिने “ज्यांनी नायिका होण्याचे स्वप्न माझ्या मनात पेरल्याबद्दल त्यांचे आभार” असं म्हणत दिग्दर्शक व निर्मात्यांचे आभार मानले आहेत. तसेच “मला अजून खूप शिकायचं आहे. खूप प्रवास कारायचा आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. पण माझ्या या प्रवासाला सुरुवात झाली असल्याचा मला आनंद व अभिमान आहे. तसेच नायक व नायिका म्हणून हा माझा पाहिलाच चित्रपट आहे.” असंही तिने म्हटलं आहे.
आणखी वाचा – ‘अॅनिमल’ चित्रपटाचा जगभरात डंका, सुपरहिट चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड, आतापर्यंत कमावले तब्बल…
दरम्यान, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळट आहे. या चित्रपटात लंडनमध्ये मिसळचं हॉटेल उभं करण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या दोन बहिणींची कथा बघायला मिळणार आहे आणि या दोन बहिणींच्या भूमिकेत ऋतुजा व रितीका आहेत. या चित्रपटाची कथा जालिंदर कुंभार यांनी लिहिली आहे, तर पटकथा व संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत. अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै व आरोन बसनेट यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.