शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सिंघम अगेन’च्या सेटवर अजय देवगणला गंभीर दुखापत, अ‍ॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला जखम झाली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 5, 2023 | 11:10 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
bollywood actor ajay devgn accident during the shooting of the movie singham again set

'सिंघम अगेन'च्या सेटवर अजय देवगणला गंभीर दुखापत, अ‍ॅक्शन सीन शूट करताना डोळ्याला जखम झाली अन्…

“जिस में है दम तोच फक्त बाजीराव सिंघम” या सुप्रसिद्ध डायलॉगने हिंदीसह मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘सिंघम’ या लोकप्रिय चित्रपटातील हा डायलॉग आहे. सिंघम या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाली होती. यानंतर या चित्रपटाचा ‘सिंघम रिटर्न्स’ हा दूसरा भागदेखील आला होता. आणि आता या चित्रपटाचा ‘सिंघम अगेन’ हा तिसरा भागदेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता अजय देवगणचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. (Ajay Devgan Accident News)

या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सेटवर मोठा अपघात घडला आहे. या अपघातात अभिनेता जखमी झाला आहे. तो जखमी झाल्याचे कळताच आता त्याचे चाहते काळजीत पडले आहेत. या दुर्घटनेत त्याला मोठी इजा झाल्याचे समोर आले आहे  ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना सेटवर घडलेल्या अपघातात अभिनेता जखमी झाला. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईतील विलेपार्ले येथे या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. यावेळी अजय एका अ‍ॅक्शन सीनचे शूटिंग करत होता. या सीनदरम्यानच त्याचा अपघात झाला.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

आणखी वाचा – “बायकांनी असं केलेलं…”, नवऱ्याला Liplock करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे मृण्मयी देशपांडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अशी फालतुगीरी…”

एका कॉम्बॅट सीक्‍वेन्‍सच्‍या शूटिंगच्‍या वेळी चुकून अजयच्‍या चेहऱ्यावर मार लागला. त्‍यामुळे त्याच्या डोळ्याला इजा झाली आणि त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचारदेखील केले. यानंतर काही तासांचा ब्रेक घेतल्यानंतर त्याने पुन्हा लगेच शूटिंगला सुरुवातदेखील केली. दरम्यान त्याची तब्येत आता ठीक असून चाहत्यांनी काळजी करू नये, असे त्याच्या टीमकडून सांगण्यात आल आहे.

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये तुफान गर्दी, तीन दिवसांतच कमावले इतके कोटी, चित्रपटातील मराठी कलाकारांचंही कौतुक अन्…

दरम्यान, या चित्रपटात प्रेक्षकांसाठी अनेक सरप्राइजेस आहेत. अजय देवगण व करीना कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. तर दीपिका पदूकोण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर यांच्यादेखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी ‘सिंघम अगेन’ प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

Tags: ajay devgnbollywood actorbollywood newsentertainmententertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Hemant Dhome Answers To Trollers

"आमच्या इथे तर काळं कुत्र नाही…", 'झिम्मा २' हाऊसफुल म्हणताच नेटकऱ्याची कमेंट, हेमंत ढोमे संतापला, म्हणाला, "सिनेमा माणसांसाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.