सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बायकांनी असं केलेलं…”, नवऱ्याला Liplock करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे मृण्मयी देशपांडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अशी फालतुगीरी…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 5, 2023 | 10:03 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
marathi actress mrunmayee deshpande troll for liplock kiss photo with her husband swapnil rao

“बायकांनी असं केलेलं…”, नवऱ्याला Liplock करतानाचा फोटो शेअर केल्यामुळे मृण्मयी देशपांडे ट्रोल, नेटकरी म्हणाले, “अशी फालतुगीरी…”

कट्यार काळजात घुसली, नटसम्राट यांसारख्या अनेक चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे मृन्मयी देशपांडे. नुकतंच तिने सारगेमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनदेखील केले होते. ती सोशल मीडियावर आपले अनेक स्टायलिश फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. तिच्या अनेक फोटोंना लाईक्स व कमेंट्सद्वारे चाहत्यांकडून पसंती मिळत असते. अशातच तिच्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मृन्मयी व तिचा नवरा स्वप्नील राव यांच्या लग्नाला ७ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या जोडीने त्यांचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि याच फोटोमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Mrunmayee Deshpande On instagram)

मृण्मयीने स्वप्नील राव याच्याशी २०१६ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला ७ वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ते एकमेकांना लिपलॉक करताना दिसत आहेत. “७! आय लव्ह यू राव…” असं म्हणत तिने हा खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र या फोटोमुळे तिला ट्रॉलिंगलादेखील सामोरे जावे लागले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोखाली नेटकऱ्यांनी नकारात्मक कमेंट्स करत तिच्यावर टीका केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande – Rao (@mrunmayeedeshpande)

आणखी वाचा – ‘अ‍ॅनिमल’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटरमध्ये तुफान गर्दी, तीन दिवसांतच कमावले इतके कोटी, चित्रपटातील मराठी कलाकारांचंही कौतुक अन्…

अनेक नेटकऱ्यांनी या फोटोखाली टीका करत असे म्हटले आहे की,  “मराठी कलाकार आहात, मराठी संस्कृती जपा, हल्ली प्रेम जगजाहीर करण्याची फॅशनच आली आहे, हे तुझे एकांतातले क्षण दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नसतात, तू साधी मुलगी आहेस अशी उथळ वागू नकोस, प्रेम व रोमान्स हा चार भिंतीत व्यक्त केला पाहिजे असा सोशल मीडियावर नाही, ही आपली संस्कृती नाही आपल्या बायकांनी असं केलेलं चालत नाही तुम्ही सगळे पाश्चात्य संस्कृतीमुळे बिघडत चालला आहात, लाजा सोडल्या तुम्ही” अशा अनेक कमेंट्स करत तिला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा – “सनातन हिंदू धर्म संपवण्याचे…” तीन राज्यातील भाजपाच्या विजयानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “जय श्रीराम आणि…”

दरम्यान, तिने शेअर केलेल्या या फोटोवर सोनाली अभिनेत्री कुलकर्णी, पूजा सावंत, अमृता खानविलकर, नम्रता संभेराव, प्रार्थना बेहेरे, सायली संजीव त्याचबरोबर अभिनेता अभिजीत खांडकेकर, सुव्रत जोशी, गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांसारख्या अनेक मराठी कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे व त्यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेक चाहत्यांनीदेखील या फोटोला पसंती दाखवली आहे.

Tags: entertainmententertainment newsmarathi actressMarathi newsmrunmayee deshpande
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Mugdha Vaishampayan Sister Wedding

पारंपरिक पोशाख, फुलांची सजावट अन्…; मेहुणीच्या लग्नासाठी सासरी पोहोचला प्रथमेश लघाटे, होणाऱ्या बायकोबरोबरचे फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.