रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हळद लागली! मुग्धा वैशंपायनच्या बहिणीची लगीनघाई, हळदीचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली, “ताईची…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 4, 2023 | 1:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Vaishampayan Sister Wedding

हळद लागली! मुग्धा वैशंपायनच्या बहिणीची लगीनघाई, हळदीचे फोटो समोर, पोस्ट शेअर करत म्हणाली, "ताईची..."

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. मुग्धा हिने तिच्या आवाजाच्या जादूने लाखो प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मुग्धाच्या गायनाचे अनेक चाहते दिवाने आहेत. मुग्धाने तिच्या गायनाच्या कलेने प्रत्येकाचं मन जिंकलं. काही महिन्यांपूर्वीच मुग्धाने प्रेक्षकांसह एक आनंदाची बातमी शेअर केली होती. मुग्धाने लोकप्रिय गायक प्रथमेश लघाटेसह नात्यात असल्याची कबुली देत तिने ‘आमचं ठरलं’ म्हणत एकत्र फोटो शेअर केला होता. (Mugdha Vaishampayan Sister Wedding)

मुग्धाने नात्याची कबुली दिल्यानंतर तिच्या केळवणाचे अनेक फोटोस, व्हिडीओस सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यादरम्यान मुग्धाने शेअर केलेल्या फोटोवरून आणखी एक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुग्धापाठोपाठ तिच्या मोठ्या बहिणीचंही लग्न ठरलं आहे. मुग्धाच्या बहिणीचं लवकरचं लग्न होणार आहे. सध्या तिच्या लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – Video : ३३ वर्ष नोकरी, सेवानिवृत्ती अन्…; मुग्धा वैशंपायनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर, नावाजलेल्या कंपनीमध्ये सन्मान आणि…

मुग्धाची मोठी बहीण मृदुल हिची लगीनघाई सुरु झाली आहे. काल प्रथमेश लघाटेने खास मेहुणीच्या मेहंदी सोहळ्याचा फोटो शेअर केला होता. तर आज मुग्धाच्या बहिणीची हळद असलेली पाहायला मिळत आहे. मुग्धाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून ताईच्या हळदीनिमित्त खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मुग्धा व तिची बहीण पाहायला मिळत आहे. दोघींना हळद लागलेली असून ‘ताईची हळद’ असं कॅप्शन देत मुग्धाने हा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा – “त्रास होऊनही भाडं…”, गेले चार महिने ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “मानसिक आरोग्यावर परिणाम…”

मुग्धाच्या केळवणाबरोबर तिच्या बहिणीचंही केळवण करण्यात आलं होतं. मुग्धासह तिची मोठी बहीण बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसते. मुग्धाच्या मोठ्या बहिणीची लगीनघाई पाहता आता मुग्धा व प्रथमेश लग्नबंधनात कधी अडकणार याची चाहते वाट पाहत आहेत. अद्याप तरी त्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख चाहत्यांना सांगितलेली नाही. त्यामुळे चाहते त्यांच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.

Tags: mugdha vaishampayanmugdha vaishampayan familymugdha vaishampayan sisterMugdha Vaishampayan Sister Weddingprathmesh laghate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Ankita admits she was possessive about sushant singh

"तिने सुशांतला मिठी मारली अन्…", विकी जैनशी लग्न होऊनही सुशांत सिंह राजपूतला विसरु शकली नाही अंकिता लोखंडे, म्हणाली, "खूप राग यायचा कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.