‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातला होता. सण असल्यासारखा हा सिनेमा साजरा केला. महिलावर्ग नटून थटून आपल्या मैत्रिणींबरोबर, बहिणीबरोबर सिनेमा पाहायला गेले. चित्रपटावर, चित्रपटाच्या कथेवर, चित्रपटातील कलाकारांवर प्रेक्षकांनी अक्षरशः भरभरून प्रेम केलं. (Baipan Bhari Deva Actress In Thailand)
सहा बहिणींभोवती फिरणारं कथानक या चित्रपटात पाहायला मिळालं. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा चौधरी या अभिनेत्रींच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळाल्या. अशातच आता या चित्रपटातील या अभिनेत्री काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आल्या आहेत. चित्रपटातील अभिनेत्रींचे ट्रिप एन्जॉय करतानाचे काही खास व्हिडीओ, फोटो समोर आले आहेत.
सुचित्रा बांदेकर, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टंगडी या चौघीजणी परदेशवारी करण्यात व्यस्त आहेत. सध्या या चौघीजणी एकत्र थायलँड येथे फिरायला गेल्या आहेत. तेथे मज्जा-मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. अशातच चौघींच्या एकत्र एका फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्री शिल्पा नवलकर हिने चौघींचा एक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

थायलँडमध्ये या चौघीजणी मराठमोळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांचा हा मराठमोळा लूक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये चौघींनी नऊवारी साडी नेसलेली पाहायला मिळत आहे. भव्य पॅलेसमध्ये त्या उभ्या असलेल्या दिसत आहेत, आणि नऊवारी साडी व महाराष्ट्रीयन लूकमद्ये त्या खूपच सुंदर दिसत आहे. त्यांच्या या मराठमोळ्या लूकने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. शिल्पा नवलकरने शेअर केलेली ही स्टोरी अभिनेत्री सुकन्या मोने यांनी रिपोस्ट करत ‘माय फेअर लेडी, थायलँड’ असं म्हटलं आहे.
याआधीही सुचित्रा बांदेकर यांनी थायलँडमधील समुद्राजवळच्या एका रेस्टोरंटमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी “पाहा, आम्ही अशा ठिकाणी आलो आहोत”असं म्हणत सर्वांना क्रूजवर धमाल करतानाचा व्हिडीओ दाखवला. सध्या या अभिनेत्री परदेशात एन्जॉय करत असून एकत्र क्वालिटी टाइम शेअर करत आहेत.