शुक्रवार, एप्रिल 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर मृण्मयी देशपांडे नवऱ्याबरोबर करत आहे स्ट्रॉबेरीची शेती, व्हिडिओमध्ये दिसली संपूर्ण झलक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 28, 2023 | 5:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mrunmayee Deshpande On Husband

Video : महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर मृण्मयी देशपांडे नवऱ्याबरोबर करत आहे स्ट्रॉबेरीची शेती, व्हिडिओमध्ये दिसली संपूर्ण झलक

लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर तिच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये मृण्मयीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याशिवाय बऱ्याच रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन करूनही तिने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली. मृण्मयीने अभिनय क्षेत्र तर गाजवलंच याशिवाय ती शेती व्यवसायाकडेही वळली आहे. अभिनयातून ब्रेक घेत ती शेती करते, याचबरोबर आता मृण्मयी शेती व्यवसायाकडेही वळली आहे.(Mrunmayee Deshpande On Husband)

गेल्या काही वर्षांपासून मृण्मयी शेती करण्यात रमली आहे. अभिनयातून मोकळं वेळ मिळाला की ती तिच्या पतीबरोबर महाबळेश्वर येथे शेती करत असते. मृण्मयी व तिचा पती २०२० पासून मुंबई सोडून महाबळेश्वर येथे राहत आहे. त्यांनी महाबळेश्वरला छोटंसं टुमदार घरही बांधलं आहे. ती अनेकदा तिचे तिच्या शेतातले फोटो व व्हिडिओही चाहत्यांसह शेअर करत असते. त्यानंतर आता तिने शेतीपूरक व्यवसायही सुरू केला आहे.

आणखी वाचा – नाकात नथ, नऊवारी साडी अन्…; ‘बाईपण भारी देवा’च्या अभिनेत्रींचा थायलँडमध्ये मराठमोळा लूक, फोटोने वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Neil & Momo (@neilandmomo)

अशातच साध्य मृण्मयी तिच्या नवऱ्याबरोबर महाबळेश्वर येथे क्वालिटी टाइम शेअर करताना दिसत आहे. तिने नुकताच त्यांच्या शेतातील एक व्हिडीओ स्टोरीवरून पोस्ट केला आहे. यांत मृण्मयीचा नवरा स्वप्नील राव व त्यांचा पेट मस्ती करताना दिसत आहेत. याशिवाय स्वप्नीलने ही एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मृण्मयी व स्वप्नील स्ट्रॉबेरीची शेती करण्याची तयारी करत आहेत.

आणखी वाचा – “मालिकेतील कलाकारांना अजूनही कमी लेखलं जातं आणि…”, सुकन्या मोने स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या, “तीन महिने पगारासाठी…”

स्वप्नीलने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मृण्मयी तिच्या पतीबरोबर स्ट्रॉबेरीची शेती बनवायला लागणारे गवत आणायला गेली आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी त्यांनी नॅचरल गवत आणलं आहे. ज्याबद्दल ते या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वप्नील स्ट्रॉबेरीच्या शेतीबाबतची माहिती देताना दिसत आहे. सध्या मृण्मयी पतीबरोबर महाबळेश्वर येथे क्वालिटी टाइम शेअर करताना दिसत आहे.

Tags: entertainmentmarathi actressmrunamyee deshpande farmingmrunmayee deshpande
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Divyanka Tripathi Vivek Dahiya IVF controversy
Entertainment

IVF च्या खोट्या बातम्यांवर भडकलं सुप्रसिद्ध जोडपं, लग्नाच्या १० वर्षांनी होणार आहेत पालक, म्हणाले, “आम्हाला विचारा…”

एप्रिल 10, 2026 | 1:30 pm
Anant Ambani Birthday
Entertainment

अनंत अंबानींच्या वाढदिवसाचा जल्लोष, बॉलिवूड जामनगरीत अवतरलं, रणवीर सिंग ते सलमान खान आणि…

एप्रिल 10, 2026 | 12:30 pm
Sushma Shiromani on rekha
Entertainment

‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला’ गाण्यात रेखा कशी आली?, सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेने सांगितलं खरं कारण, म्हणाल्या, ” पैशाची…”

एप्रिल 10, 2026 | 11:30 am
Aditi Dravid Struggle
Entertainment

Lead Role च्या ऑडिशन्स दिल्या पण…; मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “देवाशी भांडलेले…”

एप्रिल 10, 2026 | 10:31 am
Next Post
bollywood actor randeep hooda and lin laishram announced their marriage by sharing a special post on social media

रणदीप हुड्डा गर्लफ्रेंड लीन लैश्रामबरोबर अडकणार विवाहबंधनात, 'या' ठिकाणी होणार लग्न, तर मुंबईत पार पडणार ग्रँड रिसेप्शन पार्टी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.