बॉलिवूड चित्रपटांपाठोपाठ मराठी चित्रपटांसाठीही प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. ‘वेड’, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर मराठी चित्रपटांची रांग लागली आहे. अशातच सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा २’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात व्यस्त आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक झिम्मा २ चित्रपट पाहण्यास गर्दी करताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने उत्तम गल्ला जमवलेला पाहायला मिळत आहे. (Jhimma 2 Box Office Collection)
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना या चित्रपटाने दोन दिवसांत किती कलेक्शन केलं हे नुकतंच समोर आलं आहे. ‘झिम्मा २’मध्ये सात बायकांची मैत्री अधिकच घनिष्ट पाहायला मिळाली. सात मैत्रिणी व त्याच्या सात तऱ्हा चित्रपटात पाहायला मिळत आहे. प्रत्येकीची प्रेम व्यक्त करण्याची भाषा वेगळी असलेली चित्रपटात पाहायला मिळत आहे.
बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे चार दिवस झाले आहेत. चार दिवसांत या चित्रपटाने करोडोंचा गल्ला जमवला आहे. ‘Sacnilk Team ‘ या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ‘झिम्मा २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १ कोटी २० लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता चित्रपटाचं दोन दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. ‘झिम्मा २’ या चित्रपटाने दोन दिवसांत ६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. रिंकू राजगुरू हिने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यांत रिंकूने नेमकी चित्रपटाने किती कमाई केली आहे याबाबत स्पष्ट केले आहे. ४ कोटी ७७ लाख रुपये इतकी कमाई चित्रपटाने केली असल्याचं रिंकूच्या पोस्टवरून समोर आलं आहे.
‘झिम्मा २’ चित्रपटाच्या टिझर, ट्रेलरने चांगलंच धुमाकूळ घातला होता. त्यांनतर चित्रपटातील ‘मराठी पोरी’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः साऱ्यांना थिरकायला भाग पाडलं. आणि आता हा चित्रपटचं चित्रपटगृहांमध्ये भरघोस कमाई करताना पाहायला मिळतोय. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपटात चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सिद्धार्थ चांदेकर पाहायला मिळत आहेत.