शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : साध्याच घरात राहिली, अस्सल गावरान जेवण अन्…; सासरकडील मंडळींच्या प्रेमाने भारावली क्रांती रेडकर, म्हणाली, “पण आता…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 20, 2023 | 6:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kranti Redkar share a Video

Video : साध्याच घरात राहिली, अस्सल गावरान जेवण अन्…; सासरकडील मंडळींच्या प्रेमाने भारावली क्रांती रेडकर, म्हणाली, "पण आता…"

मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या अभिनयातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आलेली आहे. ‘जत्रा’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘खो-खो’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. शिवाय ती उत्तम नृत्यांगणा असून तिच्या नृत्याविष्काराची झलक प्रेक्षकांना अनेकदा पाहायला मिळाली आहे. त्याचबरोबर ती दिग्दर्शिका, उद्योजिका व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहे. सध्या ती अभिनय करत नसली, तरी ती या क्षेत्रात प्रचंड सक्रिय आहे. (Kranti Redkar share a Video)

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली क्रांती नेहमीच तिच्या कुटुंबियांबरोबरचे अनेक फोटोज व व्हिडीओज चाहत्यांसह शेअर करते. अशातच अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगते. क्रांती नुकतीच सहकुटुंब दिवाळीनिमित्त तिच्या वाशिम येथील सासरी पोहोचली असून ती तिच्या नातेवाईकांसह मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करताना दिसली. या क्षणाचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर देखील शेअर केला होता. असाच एक व्हिडीओ नुकतंच शेअर केला आहे.

या व्हिडीओला कॅप्शन देताना ती म्हणाली, “यावर्षीची दिवाळी आमच्यासाठी विशेष होती. कारण यंदा आमच्या नातेवाइकांसह आम्हाला दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. मला त्यांची खूप आठवण येईल. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं. आमचे लाड केले, काळजी घेतली हे सर्व सांगण्याच्या पलीकडे आहे. त्याचबरोबर, वाशिमच्या जनतेने आमच्याप्रती जो प्रेम आणि जिव्हाळा दाखवला, त्याच्यासाठी सुद्धा तुमचे आभार”. या व्हिडिओमध्ये ती तिच्या कुटुंबाची ओळख करताना दिसली. तसेच, यावेळी तिने पती समीर वानखेडे यांच्यासह अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घेतला.

हे देखील वाचा – “भिमाची पुण्याई…”, स्वतःचं पेट्रोल पंप सुरु केल्यानंतर आदर्श शिंदेची पोस्ट, म्हणाला, “आमच्या गावी…”

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

“मी इथे वाशिमला माझ्या सासरी आलेली आहे. मिस्टर वानखेडे जेवण करत आहेत. ही माझ्या सासरची मंडळी आहे. मोठी आत्या, छोटी आत्या, माझी काकी सगळे हाय करत आहेत. माझं इंटरमिटंट फास्टिंग चालू होतं, पण आता इंटर मटणट फास्टिंग झालेलं आहे. रोज माझ्या सासरी मटण भाकरीचा बेत सुरु आहे. आणि इतकं अप्रतिम आणि चविष्ट जेवण रोज मी जेवते. माझ्या सासरी माझे खूप लाड झाले, पण आता मुंबईत जाऊन परत कामात रुजू व्हायचं. त्यामुळे मी या सर्वांना खूप मिस करणार आहे.”, असं क्रांती या व्हिडिओमध्ये म्हणाली.

हे देखील वाचा – प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विनोद थॉमस यांचं निधन, बंद कारमध्ये सापडला अभिनेत्याचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

क्रांतीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहे. तर काही चाहत्यांनी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. एकूणच, क्रांतीच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, क्रांतीने काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘ढोलकीच्या तालावर’ कार्यक्रमात परीक्षकांची भूमिका निभावली होती. यानंतर ती कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Tags: kranti redkarKranti Redkar share a Videoviral video
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Jui Gadkari make a Faraal on Tharla tar Mag set

Video : 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरीने सेटवरच बनवला दिवाळीचा फराळ, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "तुम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.