रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मुलगी झाली हो’ फेम ‘या’ अभिनेत्रीने घेतली नवी कोरी आलिशान गाडी, कुटुंबियांसह स्वतः ड्राईव्ह केलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 15, 2023 | 10:21 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Shweta Ambikar New car

'मुलगी झाली हो' फेम 'या' अभिनेत्रीने घेतली नवी कोरी आलिशान गाडी, कुटुंबियांसह स्वतः ड्राईव्ह केलं अन्...

सर्वत्र दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. दिवाळीनिमित्त सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार मंडळींपर्यंत सगळेचजण दिवाळी साजरी करण्यात मग्न असलेले पाहायला मिळत आहेत. दिवाळी साजरी करतानाचे अनेक फोटोस, व्हिडीओस ते सोशल मीडियावरून चाहत्यांसह शेअरही करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीने दिवाळी साजरी करत आहे. काहींनी दिवाळी सणाचे औचित्य साधत घर, गाडी, मोबाईल घेतल्याच्या गुडन्यूज चाहत्यांसह शेअरही केल्या आहेत. (Shweta Ambikar New car)

अशातच छोटा पडदा गाजवणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीने नवी कोरी गाडी खरेदी केली असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘मुलगी झाली हो’, ‘रमा राघव’ मालिकांमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्वेता अंबिकर. श्वेताने तिच्या अभिनयकौशल्याने छोटा पडदा चांगलाच गाजवला. सध्या श्वेता रमा राघव या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

आणखी वाचा – दिवाळी पाडव्यानिमित्त हेमांगी कवीला नवऱ्याकडून मिळाली खास भेटवस्तू, फोटो पोस्ट करत म्हणाली, “आमच्या माणसाने…”

श्वेता सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच श्वेताच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. श्वेताने तिच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. यांत एक व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने नवी कोरी आलिशान गाडी खरेदी केली असल्याची गुडन्यूज शेअर केली. गाडी खरेदी करतानाचा एक व्हिडीओ तिने चाहत्यांसह शेअर केला आहे. दिवाळीचं औचित्य साधत श्वेताने नवी गाडी खरेदी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shweta Ambikar (@shweta_ambikar)

आणखी वाचा – “मर्सिडीज घ्यायची ना”, मिताली मयेकरने नवी कार घेतल्यानंतर नेटकऱ्याने सुनावलं, अभिनेत्री म्हणाली, ” माझा बजेट तेवढा…”

गाडी खरेदी करताना तिने तिच्या कुटुंबियांबरोबर हजेरी लावली होती. या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळतंय की, श्वेताने गाडी खरेदी केल्यानंतर स्वतः ड्राईव्ह करत कुटुंबियांना घेऊन फेरफटका मारला. श्वेताच्या या पोस्टवर ओमप्रकाश शिंदे, अश्विनी महांगडे, नंदिता पाटकर, ऐश्वर्या शेट्ये या कलाकार मंडळींनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. तर श्वेताच्या चाहत्यांनीही तिच्या या आनंदात सहभागी होत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ‘दुर्वा’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकांमधून श्वेताने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मात्र श्वेताला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली ती ‘मुलगी झाली हो’ आणि ‘रमा राघव’ या मालिकांमुळे.

Tags: entertainmentmarathi actressmarathi serialshweta ambikar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
maharashtrachi hasyajatra fame actor prasad khandekar shared diwali special photos on social media with his friends and family

नव्या घरात प्रसाद खांडेकरची कुटुंबिय-मित्रपरिवारासह जल्लोषात दिवाळी, म्हणाला, "गाठीभेटी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.