मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. त्यांनी आपल्या अभिनयाच्या व सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. ९०च्या दशकापासून त्यांची क्रेझ आजही तितकीच आहे. सध्या त्या ‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारताना दिसतात. ऐश्वर्या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असतात. विविध ट्रेंन्डिंग गाण्यावर व्हिडीओ, रिल्स बनवताना दिसतात. या व्हिडीओंना नेटकऱ्यांकडून बरीच पसंती मिळत असते. पण बऱ्याचदा त्यांना ट्रोलचाही सामना करावा लागतो. बऱ्याचदा ऐश्वर्या त्यांना सडेतोड उत्तरही देताना दिसतात. आताही ऐश्वर्या यांनी योगा सेशनचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यावर एका ट्रोलर्सने पुन्हा त्यांना ट्रोल केलं आहे. त्यावर पुन्हा ऐश्वर्या यांनी अनोख्या अंदाजात सुनवलं आहे.(aishwarya narkar answered to trollers)
ऐश्वर्या या त्यांच्या अभिनयासह त्यांच्या फिटनेससाठीही बर्याच चर्चा होताना दिसतात. त्यांच्या फिटनेसची तर बातच निराळी आहे. अगदी युगापिढीलाही लाजवेल असा त्यांचा फिटनेस आहे. त्यांच्या फिटनेसचं रहस्य म्हणजे त्यांचं नेहमीचं वर्कआऊट शेड्युल ज्या त्या नेहमी काटेकोरपणे पाळताना दिसतात. त्या इन्स्टाग्रामवर त्यांचे योगा सेशनचे व्हिडीओ शेअर करत असतात.

आताही त्यांनी त्यांच्या नवीन आसन प्रकाराचा व्हिडीओ पोस्ट केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओत ऐश्वर्या शीर्षासन हा ताळमेळ साधण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण प्रकार करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये, ‘सराव करा… नक्की ध्येय गाठाल…’, असं लिहीलं आहे.हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांनीही लाईक, कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या बाजुला ट्रोलर्सनी संधी साधली आहे. त्या व्हिडीओवर, ‘वा वा आज पाडव्याला अशाच पोजमध्ये ओवाळायचे असते’, असं लिहीत कमेंट केली आहे. याला उत्तर देत ऐश्वर्या यांनी व्हिडीओसहीत कमेंटचा स्कीनशॉट शेअर करत ‘यांच्या विचारांचं काय करावं!?’, असा उद्गारार्थी प्रश्न उपस्थित केला आणि पुन्हा एकदा ट्रोलर्सना त्यांच्या अंदाजात उत्तर दिलं आहे.