प्रसिद्ध हिंदी टीव्ही शो ‘बिग बॉस’चं १७ वं सीझन सध्या सुरू आहे. हा वादग्रस्त शो येथील घरात बंद असलेल्या स्पर्धकांच्या खेळांसह त्यांच्या भांडणामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. त्यामुळेच चाहत्यांना या शोबद्दल नेहमीच उत्सुकता लागलेली असते. सध्या या शोमध्ये अंकिता लोखंडे व विकी जैन ही रिअल लाईफ जोडी तुफान चर्चेत आहे. शोच्या पहिल्याच दिवसांपासून दोघांमध्ये जोरदार भांडणं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, नील भट्ट व ऐश्वर्या शर्मा यांच्यातही आपापसात वाद होतानाचे चित्र सध्या प्रेक्षकांना दिसत आहे. अशात या शोमध्ये आता आणखी दोन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bigg Boss 17 wild card entry)
‘बिग बॉस’मध्ये काही दिवसांपूर्वी समर्थ जुरेल आणि मनस्वी ममगाई यांनी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री केली होती. त्यापैकी मनस्वी अवघ्या एका आठवड्यातच घरातून बाहेर पडली. तर समर्थ अजूनही ‘बिग बॉस’च्या शर्यतीत कायम आहे. आता या घरात आणखी दोन स्पर्धकांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा सध्या होत आहे. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, स्पर्धक सनी आर्यची पत्नी दीपिका आर्य आणि युट्युबर राघव शर्मा यांची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री होणार आहे.
हे देखील वाचा – “त्या माणसाने तिसऱ्यांदा पायाने स्पर्श केला अन्…”, बसमध्ये तेजस्विनी पंडितबरोबर घडलेला ‘तो’ किळसवाणा प्रकार, म्हणालेली, “माझं डोकं फिरलं अन्…”
बिग बॉसच्या सुरुवातीलाच सनी आर्य बिग बॉसच्या घरात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आता या शोमध्ये त्याची पत्नी दीपिका देखील या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करणार आहे. दीपिका आर्यदेखील नवऱ्याप्रमाणेच प्रसिद्ध युट्युबर आहे. तसेच ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहत असून तिच्या फोटोज व व्हिडीओजची नेहमीच चर्चा होत असते. जर, या शोमध्ये दीपिकाची एन्ट्री झाली, तर ते दोघे एका जोडीच्या रूपातून या घरचा सदस्य बनणार आहे.
हे देखील वाचा – करीना कपूर व काजोलशी करण जोहरचं झालं होतं जोरदार भांडण, दोन वर्ष बोललेच नाहीत अन्…
तर राघव शर्मा हा ‘बिग बॉस ओटीटी’ फेम एल्विश यादव आणि अभिषेक मल्हानप्रमाणेच प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. राघवचे इन्स्टाग्रामवर ८ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहे. शोबद्दल बोलायचं झाल्यास, यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धकांमध्ये आतापर्यंत केवळ भांडणं पाहायला मिळाले. त्यापैकी अंकिता-विकी व नील-ऐश्वर्या सह ईशा मालवीय, अभिषेक कुमार व समर्थ जुरेल यांचीदेखील जोरदार चर्चा होते. गेल्याच आठवड्यात मनस्वी घरातून बाहेर पडली. त्यानंतर या आठवड्यात कोणता स्पर्धक शोमधून बाहेर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.