दिवाळी हा वर्षातून एकदा येणारा प्रमुख मराठी सण. दिवाळी हा सण सर्वांना एक उत्साह, नवचैतन्य, नवी उमेद देणारा असतो. त्यामुळे हा आनंदाचा सण केवळ महाराष्ट्रासह देश-विदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सध्या सर्वत्र दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरी फराळ बनवण्यापासून ते विद्युत रोषणाई करण्यापर्यंत लगबग सुरु आहे. तसेच, प्रमुख बाजारपेठ्यांमध्ये कपडे व विविध साहित्यांची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. त्याचबरोबर या सणात एकमेकांना भेटवस्तू देखील दिल्या जात आहे. (Eknath Shinde sent Diwali gift to Marathi actors)
सर्वसामान्यांप्रमाणे कलाकार मंडळींमध्ये दिवाळीची मोठी लगबग सुरु आहे. यानिमित्त सर्व कलाकार एकमेकांना दिवाळीच्या भेटवस्तू देत आहेत. नुकतंच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मराठी कलाकारांना यंदाच्या दिवाळीनिमित्त खास भेटवस्तू पाठवत त्यांची दिवाळी गोड केली. कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे.
हे देखील वाचा – Video : …अन् बघता बघता पडल्या ऐश्वर्या नारकर, तोल गेल्यानंतर अभिनेत्रीने काय केलं पाहा, चाहत्यांनीही तब्येतीची केली विचारपूस

एकनाथ शिंदे यांनी दिग्दर्शक विजू माने, अभिनेता प्रसाद ओक, अभिजीत खांडकेकर, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, अभिनेत्री श्रेया बुगडे व अनेक मराठी कलाकारांना दिवाळीनिमित्त भेटवस्तू पाठवत त्यांना शुभेच्छा दिल्या. कलाकारांनी या भेटवस्तूचे फोटोज व व्हिडीओज त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. त्याचबरोबर या भेटवस्तूची छोटीशी झलक दाखवली. ज्यामध्ये कार्ड्स, मिठाई व अन्य गोष्टींचा समावेश आहे. यावेळी कलाकारांनी एकनाथ शिंदेंचे आभार मानत त्यांनाही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
हे देखील वाचा – दोन्ही लेकांचं भांडण झाल्यावर करीना कपूर नेमकं काय करते?, इतर आईंप्रमाणेच लढवते शक्कल, म्हणाली, “मी माझ्या मुलांसाठी…”

याआधी शिंदे यांनी गणेशोत्सवानिमित्त ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक मराठी कलाकारांना निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी या सर्व कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. त्यावेळेस उपस्थित कलाकारांनी मुख्यमंत्र्यांसह एकत्र येत फोटोज काढले होते. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.