टेलिव्हीजन विश्वातील बहुचर्चित व वादग्रस्त कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. सध्या ‘बिग बॉस’चं १७वं पर्व बरंच गाजत आहे. या पर्वाच्या सुरुवातीपासूनच वाद-विवादांना सुरुवात झाली. कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता लोखंडे व विकी जैन यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला असल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनंतर आता ऐश्वर्या शर्मा व नील भट्ट यांच्यातदेखील काही कारणांवरून भांडण झाल्याचं चित्र दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या-नीलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघंही एकमेकांवर ओरडताना दिसत आहेत. (bigg boss 17 update)
या व्हिडिओमध्ये नील व ऐश्वर्या खाली पडलेले सामान गोळा करत एकमेकांवर ओरडत आहेत. अशातच घरातील इतर सदस्य हे नील व ऐश्वर्या यांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अंकिता लोखंडे, ईशा मालवीय व नील-ऐश्वर्या हे काही किराणा सामान उचलत असताना नील व ऐश्वर्यामध्ये भांडण होते. नील आधीच सामान घेऊन जात असताना ऐश्वर्या बॅग देण्यासाठी जाते. तेव्हा ऐश्वर्या नीलला म्हणते, “मी काही बोलत असताना तुला दिसत नाही का?”.
Role reversal ????
— MoozetiOn (@Mazzzstvvupqzz) November 6, 2023
No one thought that #AbhishekKumar will be the biggest influencer in the #BB17 house in such a short period of time & be standing at the back trying to stop others from fighting ❤️#NeilBhatt #AishwaryaSharma #AnkitaLokhande pic.twitter.com/6OBslE2u33
यावर नील म्हणतो, “माझे हात रिकामे नाहीत. हे तुला दिसत नाही का?” यावरून त्यांच्यात जोरदार भांडण होतं. या सगळ्या प्रकारानंतर जेव्हा नॉमिनेशन प्रक्रिया झाली तेव्हा ऐश्वर्या-नील व अंकिता-विकी यांनी एकमेकांना नॉमिनेट केले. या नॉमिनेशन दरम्यान ऐश्वर्या व अंकिता यांच्यात वाद निर्माण झाला. जेव्हा नीलने ऐश्वर्याला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती त्याच्यावर रागावत “मला हात लावू नको. मी बोलत असताना मला अडवू नकोस” असं ओरडून म्हणाली.
काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात विकी-अंकिता यांच्यात भांडण झालं होतं. अभिषेक ईशाबरोबर बसून बोलत होता तेव्हा अंकिता तिथून जाते. विकी-अभिषेक हे बोलत आहे हे बघून अंकिता चिडते. अंकिताचे हे वागणे विकीला आवडत नाही आणि तो चिडतो. नंतर विकी अंकिताबरोबर बसून बोलताना दिसतो आणि या दरम्यान तो अंकितावर ओरडायला लागतो.
दरम्यान येत्या शुक्रवार-शनिवारी ऐश्वर्याच्या वागणुकीबद्दल सलमान खान काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. सलमानने विकी-अंकिताला ज्याप्रकारे समजावून सांगितले, त्याच पद्धतीने तो ऐश्वर्या व नीलला समजावून सांगणार का? हेदेखील पाहावं लागेल.