बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री आलिया भट्ट यांची लेक राहा आज एक वर्षाची झाली. त्यानिमित्त अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याचबरोबर मुलीची आजी रितू कपूर व सोनी राजदान यांनीही एक पोस्ट शेअर करत तिला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. नुकताच राहाचा पहिला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा झाला असून तिच्या सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामध्ये ती तिच्या आई-बाबांसह खेळताना दिसली. त्याचबरोबर, हा फोटो शेअर करताना तिने एक खास पोस्ट लिहीत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (Alia Bhatt share a post on her Daughter first Birthday)
आलियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर राहाच्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले. ज्यातील पहिल्या फोटोत राहा केकची नासधूस करत खेळताना दिसते. तर दुसऱ्या फोटोत ती तिच्या आई-वडिलांसह हात जोडताना दिसली. तिसऱ्या फोटोमध्ये राहा आई-वडिलांसह एक फ्रेंच गाणं ऐकताना दिसली. हे फोटोज शेअर करताना ती म्हणाली, “आमचा आनंद, आमचा जीवन आणि आमचा उज्ज्वल! कालच आम्ही हे गाणं तुझ्यासाठी वाजवत होतो जेव्हा तू माझ्या पोटात होती, असं वाटतं होतं. आम्हाला तुला सांगण्यासारखं असं काही नाही. आम्ही भाग्यवान आहोत की तू आमच्या आयुष्यात आली, इतकंच सांगू शकतो. तू प्रत्येक दिवस आम्हाला एखाद्या स्वादिष्ट केकच्या तुकड्याप्रमाणे वाटू दिले. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आम्ही तुझ्या प्रेमापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर करतो.”
हे देखील वाचा – Bigg Boss 17 : अंकिता-विकी व नील-ऐश्वर्या यांच्यात जोरदार भांडण, एकमेकांच्या अंगावर धावून गेले अन्…; व्हिडीओ पाहून तुम्ही कोणाला पाठिंबा देणार?
तिच्या या पोस्टवर अभिनेत्री दिया मिर्झासह अनेक कलाकारांनी कमेंट करत राहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याआधी आजी रितू कपूर, सोनी राजदान व काकू रिधिमा कपूर यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याआधी आलियाने दिलेल्या एका मुलाखतीत लेक राहाचा चेहरा लपवण्यावरून विचारले असता तिला या गोष्टीचा अभिमान वाटत असल्याचं म्हणाली.
हे देखील वाचा – “गुडघ्यावर बसून प्रपोज केलं अन्…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली प्रेमाची जाहीर कबुली, बॉयफ्रेंडबरोबरचे फोटो समोर
आलिया काही दिवसांपूर्वी ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’मध्ये झळकली होती, ज्यात तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. ती सध्या वासन बाला दिग्दर्शित ‘जिगरा’ चित्रपटाच्या शूटमध्ये व्यग्र आहे.