अभिनेत्री रुबिना दिलैक आणि अभिनेता अभिनव शुक्ला ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. सध्या या जोडीने चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला लवकरच आई बाबा होणार आहेत. या दोघांची जोडी ‘बिग बॉस’च्या घरातील त्यांच्या प्रवासामुळे विशेष चर्चेत आली. रुबिना व अभिनव ‘बिग बॉस’मुळे विशेष चर्चेत आले. नेहमीच ही जोडी एकत्र फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. (Rubina Dilaik Maternity Photoshoot)
अलीकडेच, रुबिना दिलैकने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून गरोदरपणातील फोटोशूटच्या फोटोंची झलक शेअर केली. रुबिनाच्या या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रुबिना व अभिनव या दोघांनीही पांढर्या रंगाचे कपडे परिधान करत हे खास फोटोशूट केलं आहे. यांत रुबिनाने एक लांब वेणी आणि उत्कृष्ट सोनेरी दागिने परिधान करून तिच्या लूकमध्ये भर घातली आहे. यांत रुबिनाने तिचा पती अभिनवचा हात हातात घेऊन फोटो काढला आहे.
या मनमोहक फोटोंबरोबर कॅप्शनमध्ये रुबिनाने लिहिलं आहे की, ‘तिच्या आयुष्यातील एक अवर्णनीय चमत्कार’. रुबिना ‘बिग बॉस १४’ ची विजेती आहे. तिने तिच्या मातृत्वपणाचे अनेक फोटोस आकर्षक कॅप्शनसह सोशल मिडीयावरून शेअर केले आहेत. रुबिनाच्या मॅटर्निटी शूटमध्ये टिपलेल्या या खास क्षणांचे अनेकांनी कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिच्या लुकला पाहून ट्रोल केले आहे.

एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे की, “सर्व ठीक आहे पण या अवस्थेत नग्न फोटो शेअर करण्याचा उद्देश काय होता? बाळ झाल्यानंतर तुम्ही त्याला झाकून ठेवता, ते तुम्हाला चालतं”. तर आणखी एका युजरने रुबिनाचं फोटोशूट पाहून संताप दर्शवत म्हटलं आहे की, “आतापर्यंत गरोदरपणात केलेल्या फोटोशूटपैकी हे एक वाईट फोटोशूट आहे. या फोटोशूटला काहीचं अर्थ नाही”. अशा अनेक कमेंट करत फोटोशूटवरून रुबिना व अभिनवला ट्रोल केलं आहे.