आपल्या हटके नृत्यशैलीने जी प्रेक्षकांना कायम घायाळ करते ती म्हणजे अभिनेत्री, नृत्यांगना मानसी नाईक. मानसी नाईकच्या अदाकारीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने आपल्या नृत्यशैलीने आजवर अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. नेहमीच ती अनेक रील्स, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. याशिवाय ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. मानसीने पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेतला असल्याची चांगलीच चर्चाही रंगली होती. (Manasi Naik Troll)
मानसी नाईक व प्रदिप खरेरा यांनी १९ जानेवारी २०२१ रोजी लगीनगाठ बांधली. लग्नाआधी ते काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. लग्नादरम्यान ते दोघे सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह होते, अनेक रोमँटिक फोटोही त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले होते. मात्र त्यांच्यातील वादानंतर दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले. लग्नानंतर तिने पतीसह प्रत्येक सण उत्साहाने साजरा केला. मात्र त्यांच्यातील वादानंतर त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
अशातच मानसीने करवा चौथनिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यांत मानसीने लाल रंगाची साडी नेसली असून ती नटून थटून ‘चाँद छुपा बादल में’ या गाण्यावर थिरकताना दिसतेय. करवा चौथनिमित्त शेअर केलेला हा तिचा व्हिडीओ “तु्म्हारे और तुम्हारे जीवनसाथ का साथी कभी ना छूटे,
खुशियों और हंसी से तुम्हारा घर आंगन महके, करवा चौथ की बधाइयां” असं कॅप्शन देत शेअर केला आहे. घटस्फोटानंतर करवा चौथ साजरी केल्याने मानसी नेटकऱ्यांच्या चांगलीच तावडीत अडकली आहे.

तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी चांगल्या व वाईट अशा दोन्ही कमेंट केल्या आहेत. यावर एका नेटकऱ्याने मानसीची बाजू सांभाळत म्हटलं आहे की, “आप ही एक चाँद हो, वो चाँद की क्या जरुरत है, जिस पर डाग हैं”. यावर मानसीने उत्तर देत “अगदी बरोबर” असं म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने ट्रोल करत म्हटलं आहे की, “कोणाच्या नावाचं करवा चौथ करतेय, नवऱ्याला तर सोडून दिलंस ना”, तर आणखी युजरने म्हटलं आहे की, “सॉरी दीदी तू तुझ्या नवऱ्याबरोबर नाही ना राहत मग कशाला हे सगळं” असं म्हणत तिला ट्रोल केलं आहे.