शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“यावेळी खूपच व्हरायटी आहे”, बहुचर्चित ‘झिम्मा २’चा टीझर प्रदर्शित, गर्ल्स गँगची धमाल अन् रिंकू राजगुरूच्या लूकने वेधलं लक्ष

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 30, 2023 | 1:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jhimma 2 Movie Teaser Out

"यावेळी खूपच व्हरायटी आहे", बहुचर्चित 'झिम्मा २'चा टीझर प्रदर्शित, गर्ल्स गँगची धमाल अन् रिंकू राजगुरूच्या लूकने वेधलं लक्ष

मराठी सिनेसृष्टीत सध्या अनेक सुपरहिट चित्रपटांचे सीक्वेल्स प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामध्ये ‘झिम्मा’चा उल्लेख आवर्जून करावा लागणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ कोरोना लॉकडाऊन नंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट होता, ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. पहिल्या भागाला मिळालेला प्रतिसाद पाहता काही दिवसांनी चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून चाहते याची आतुरतेने वाट पाहत होते. ‘झिम्मा २’चा मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. अशातच या बहुचर्चित चित्रपटाचा जबरदस्त टीझर अखेर समोर आला आहे. (Jhimma 2 Movie Teaser Out)

चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिटांचा असून ज्यामध्ये सिद्धार्थ त्यांच्या गर्ल्स गँग्सना पुढच्या ट्रीपची तयारी करण्यासाठी सांगतो. या सर्व जणी इंदूचा (सुहास जोशी) ७५वा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात. पुढे यात युरोपातील सुंदर दृश्य, त्यामध्ये त्या सात जणींची मजा-मस्ती प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरू सर्वांचे लक्ष वेधताना दिसत आहे. सिद्धार्थचा टीझरमध्ये एक डायलॉग आहे, ”यावेळेला खूपच व्हरायटी आहे.” आणि हे अगदी खरंच आहे. कारण यावेळी या गँगमध्ये आणखी दोन मैत्रिणी सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे पहिल्या भागाप्रमाणे याही भागात या इंद्रधनुष्याचे सात वेगवेगळे रंग बरसणार आहेत. हा टीझर प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा असून ही दमदार गॅंग पुन्हा एकदा रियूनियनसाठी सज्ज झाली आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात नवीनच मैत्री झाली होती, पुढे ती हळूहळू बहरत गेली. आणि आता दुसऱ्या भागात ही मैत्री अधिकच परिपक्व झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनरूपी यंदाची ही सहल अधिकच अविस्मरणीय ठरू शकते. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरसह सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव या जुन्या मैत्रिणी तर आहेच, शिवाय रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोन मैत्रिणींच्या एन्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्या भागापेक्षा अधिकच मनोरंजक ठरणार, यात शंका नाही.

हे देखील वाचा – ‘चला हवा येऊ द्या’ बंद होताच नवा कार्यक्रम सुरु होणार, नव्या प्रोमोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा, व्हिडीओ पाहिलात का?

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

चित्रपटाच्या टीझर दरम्यान अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ चित्रपटाला सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाने अनेक पुरस्कारानावर नाव कोरले. ‘झिम्मा’ चित्रपट पाहून अनेक महिलांनी, ज्या कधीही त्यांच्या कुटुंबाशिवाय बाहेर फिरल्या नाहीत. त्यांनी स्वतः त्यांच्या मैत्रिणींसोबत सहली आयोजित केल्या. तसेच अनेकांनी आम्हाला मॅसेज किंवा प्रत्यक्ष भेटून आम्हाला ‘झिम्मा २’ यावा, असं बोलले होते. प्रेक्षकांच्या प्रेमापोटीच आम्ही ‘झिम्मा २’ साठी प्रेरित झालो आणि एक चांगली कथा तयार झाली. प्रवासात आपण असे मित्र बनवतो, जे कदाचित रोज भेटणार नाहीत. पण मागच्या वेळेस जिथे थांबलो, तिथेच पुन्हा सुरू होतात! याच कल्पनेवर आधारित आमचं ही ‘रियुनियन’ यंदा दुपटीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार, हे मात्र नक्की!”

हे देखील वाचा – सायली- अर्जुन होणार आई बाबा?, अखेर डॉक्टरांनी केला शिक्कामोर्तब; सुभेदारांच्या घरात पसरलंय आनंदाचं वातावरण

जिओ स्टुडिओज आणि आनंद एल. राय प्रस्तुत, चलचित्र मंडळी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. बऱ्याच काळानंतर ही गर्ल्स गॅंग एकत्र आल्यानंतर आता त्यांचे ‘रियुनियन’ किती हॅपनिंग असणार, हे अनुभवणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: hemant dhomejhimma 2Jhimma 2 Movie Teaser Outupcoming marathi movie
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Deepa Parab On Award

“माझ्या माहेरसून…”, अंकुश चौधरीच्या बायकोचा ‘कोकण रत्न’ पुरस्काराने सन्मान, म्हणाली, “खूप खूश आसय कारण…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.