छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम ‘बिग बॉस १७’ ची जबरदस्त सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात सुरुवातीपासून अनेक वाद होताना पाहायला मिळत आहेत. सगळे स्पर्धक एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यात अभिनेत्री अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन यांच्यातील भांडण काही संपतच नाही आहेत. गेल्या आठवड्यात विकीने अंकितासमोर सांगितलं होतं की त्याने तिला सर्व काही दिलं त्यावर सलमानने आक्षेप घेत त्याला चांगलंच सुनवलं. (Salman says if my wife been part of this show)
विकीने अंकिताला सांगितलं की त्याने तिला हृदय दिलं, प्रेम दिलं, पैसा दिला. या गोष्टीवर सलमान खानने विकीला प्रश्न केला की तो फक्त स्वतःवरच प्रेम करतो का? तुझ्यासाठी अंकिताने काही केलं नाही का? आप या गोहकालचार याने स्वत-अंकिता तुझ्यावर प्रेम करत नसती तर तुमचं लग्न झालं असतं का? सलमानचे प्रश्न ऐकताच विकीने लगेच बाजू पलटत त्याने यासर्व गोष्टी गमतीत बोलला असल्याचं सांगितलं. त्याने हे ही सांगितलं की अंकिताने त्याची खूप साध दिली आहे.
Vicky Jain to his wife Ankita Lokhande
— #BiggBoss_Tak???? (@BiggBoss_Tak) October 26, 2023
"Zindagi mai mujhe tu kuch de toh paayi nhi atleast mujhe peace of mind hi de do,"
Don't you think Vicky is overreacting to the situation aur Biwi se aise baatein ???? #BiggBoss_Tak #BiggBoss17 pic.twitter.com/pPZIZZPyW8
यासर्व गोष्टी ऐकताच सलमानने त्याच्या पाठीवर मारत म्हणाला, “अंकिता जर तुला एवढी साथ देते तर तु तिला सपोर्ट करण तुझं कर्तव्य नाही का? कल्पना कर मी तुझ्या जाग्यावर मी असतो किंवा माझा भाऊ किंवा माझी पत्नी किंवा बहिण असती आणि त्यांच्यात भांडण झालं असतं तर ते मी ते पाहिलं असतं का? हा जर तो कणखर आहे त्याला कणखर बनायचं आहे तर मी ते त्यालाच हाताळू दिलं असतं. तो कमजोर आहे म्हणून त्यांनी ते हाताळावं अशी माझी इच्छा असती. पण त्यांच्यात त्यासाठीचा आत्मविश्वास दिसला असता. पण तुझ्यात तो मला दिसत नाही आहे”.
यावर विकीने सलमानला स्पष्टीकरण देत सांगितलं, “अंकिता व मी ठरवलं आहे की जेव्हा आम्ही बिग ब़ॉसच्या घरात येतील तेव्हा आम्ही स्वतःचा खेळ खेळणार. एकमेकांच्या निर्णयांवर नियंत्रण ठेवणार नाही”. या सर्व वक्तव्यांनंतर अंकिता व विकीच्या नात्यात नवीन अडचणी येतील की अडचणी दूर होतील हे पाहणं रंजक ठरणार आहे.