रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रिलेशनशिपमध्ये राहणं…”, लग्न न झाल्याचं करण जोहरला दुःख, भर कार्यक्रमात रडू कोसळलं, म्हणाला, “सिंगल असणं…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 26, 2023 | 12:00 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Koffee With Karan 8

"रिलेशनशिपमध्ये राहणं…", लग्न न झाल्याचं करण जोहरला दुःख, भर कार्यक्रमात रडू कोसळलं, म्हणाला, "सिंगल असणं…"

बॉलिवूडचा लोकप्रिय शो म्हणजे ‘कॉफी विथ करण’. करण जोहर याच्या या शोची उत्सुकता साऱ्यांनाच लागून राहिलेली असते. या कार्यक्रमात कोणते कलाकार येणार, करण जोहर सोबत होणाऱ्या गप्पा यांकडे साऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं असतं. अशातच ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाची घोषणा झाली तेव्हापासून साऱ्यांची उत्सुकता वाढली. ‘कॉफी विथ करण ८’च्या भागात बॉलिवूडमधील लोकप्रिय कपिलची एंट्री पाहायला मिळणार आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. ही जोडी म्हणजे अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण. (Koffee With Karan 8)

रणवीर व दीपिकाच्या येण्याने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. दरम्यान कार्यक्रमातील एका व्हायरल झालेल्या व्हिडीओने साऱ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका व रणवीर यांच्या लग्नातील काही खास क्षण दाखवण्यात आले आहेत. रणवीर दीपिकाच्या लग्नातील हे खास क्षण पहिल्यांदाच साऱ्यांचा पाहायला मिळाले. रणवीर-दीपिकाच्या लग्नात नातेवाईकांना मोबाइल वापरण्यास निर्बंध असल्याने त्यांच्या लग्नातील कोणतेच व्हिडीओ वा फोटो समोर आले नव्हते. अखेर त्यांच्या लग्नाच्या ५ वर्षांनी दोघांनीही ‘कॉफी विथ करण’मध्ये त्यांच्या लग्नातील खास व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – लग्नाच्या पाच वर्षांनी दीपिका पदुकोण व रणवीर सिंगच्या लग्नाचे खास व्हिडीओ व फोटो समोर, नेटकरी म्हणाले, “बाजीराव-मस्तानी…”

View this post on Instagram

A post shared by Nayandeep Rakshit (@nayandeeprakshit)

रणवीर-दीपिकाच्या लग्नातील हे खास क्षण पाहून करण जोहर भावुक झाल्याचं ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या भागात पाहायला मिळालं. आयुष्यात एकटं असल्याचं दुःख त्याने साऱ्यांसमोर मांडलं. व्हिडीओमध्ये करण असं बोलताना दिसत आहे की, “मी सध्या कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नाही. मी सिंगल आहे. आता हा व्हिडीओ पाहून मी आयुष्यात काय मिस करतोय याची जाणीव मला झाली. रिलेशनशिपमध्ये राहणं नक्कीच कठीण असतं पण, आयुष्यातील कठीण प्रसंगात तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर असणं ही तितकंच महत्त्वाचं असतं. मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे. माझ्या या कार्यक्रमात मी एवढा भावुक केव्हाच झालो नव्हतो. तुमचं हे प्रेम पाहून माझं पोट भरलं, असं मी म्हणेन.”

View this post on Instagram

A post shared by Vishal Punjabi (@theweddingfilmer)

आणखी वाचा – ‘बिग बॉस ओटीटी’ फेम एल्विश यादवकडे अज्ञातांनी केली १ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी, पोलिसांत गुन्हा दाखल

भावुक झालेल्या करण जोहरला धीर देत त्याची प्रतिक्रिया ऐकून रणवीर-दीपिका त्याला जवळ घेत आधार देतात आणि आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत, असं सांगतात. ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. शिवाय रणवीर दीपिकाच्या लग्नातील खास क्षण पाहता चाहत्यांमध्ये त्यांच्याबद्दलचा आदरही वाढला आहे.

Tags: deepika padukonedeepika ranveer koffee with karandeepika ranveer weddingkaran joharkoffee with karanranveer singhRanveer Singh and Deepika Padukone in Koffee with Karan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Karan Johar talks about his Panic Attack

अंबानींच्या कार्यक्रमात करण जोहरला आला होता 'पॅनिक अटॅक', वरुण धवनचं लक्ष गेलं अन्…; स्वतःच केला मोठा खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.