शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूर अभिनयक्षेत्रामधून घेणार ब्रेक, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “चित्रपटांच्या चित्रीकरणांमुळे…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
ऑक्टोबर 25, 2023 | 4:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ranbir Kapoor talks about his daughter Raha

रणबीर कपूर अभिनयक्षेत्रामधून घेणार ब्रेक, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला, “चित्रपटांच्या चित्रीकरणांमुळे…”

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले. ‘रॉकस्टार’, ‘बर्फी’, ‘जग्गा जासूस’, ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ यांसारख्या सिनेमांमधून अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. गेल्या वर्षी त्याचा ‘ब्रम्हास्त्र : भाग १ – शिवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. लवकरच तो ‘कबीर सिंह’ फेम दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. रणबीरचं सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर कोणतंही अकाऊंट नाही. तरी चाहत्यांमध्ये त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगतात. (Ranbir Kapoor talks about his daughter Raha)

रणबीर कपूरने आलिया भट्टबरोबर विवाह केला. दोघांना ‘राहा’ नावाची मुलगी आहे. अभिनेता कामाबरोबर त्याचं खासगी आयुष्य व्यतित करताना नेहमी दिसत असून त्याचं आणि त्याच्या मुलीचं विशेष बॉण्डिंग दिसून येतं. अशातच अभिनेत्याने नुकताच एका मुलाखतीत त्याची लेक राहाबद्दल बोलताना एक मोठा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा – पहिलं लग्न दोन वर्षामध्ये मोडलं, आता दुसऱ्या पत्नीबरोबरही सुप्रसिद्ध अभिनेत्याने घेतला घटस्फोट, दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता अन्…

रणबीरने नुकतंच ‘झूम’ या वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी तो त्याच्या मुलीबद्दल बोलताना म्हणाला की, “जेव्हा माझी लेक राहाचा जन्म झाला. तेव्हा सुरुवातीच्या काळात चित्रपटांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे मला तिच्यासह फारसा वेळ घालवता आला नाही. त्यामुळे ‘ॲनिमल’नंतर ६ महिन्यांसाठी मी अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे मला माझ्या लेकीसह वेळ घालवता येईल.” तसेच, जेव्हापासून राहा अधिक बोलकी झाली, तेव्हापासून तो पितृत्व रजा घेण्याचा विचार करत आहे. कारण, राहाची आई आलिया लवकरच तिच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र राहणार आहे.

हे देखील वाचा – “तू भाजपामध्येच जा”, नागपूरमधील नितीन गडकरींच्या घरी पोहोचली प्राजक्ता माळी, राजकीय व्यक्तींशी भेटीगाठी वाढल्यानंतर नेटकऱ्यांच्या कमेंट

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

तर मुलगी राहाबद्दल बोलताना तो म्हणाला, “ती सध्या रांगताना दिसते, लोकांना ओळखते. आई-बाबा असे शब्द ती बोलण्याचा प्रयत्न करते. आणि सर्वच जण तिच्यावर भरपूर प्रेम करतात. हा क्षण माझ्यासाठी खूपच सुंदर क्षण आहे.” दरम्यान, रणबीरचा ‘ॲनिमल’ चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्यात, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल आदी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटानंतर तो ‘ब्रम्हास्त्र’च्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.

Tags: alia bhattbollywood newsranbir kapoorRanbir Kapoor talks about his daughter Raha
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Prasad amruta share new house glimps

लग्नापूर्वीच एकत्र राहत आहेत अमृता देशमुख व प्रसाद जवादे?, दसऱ्यानिमित्त शेअर केलेल्या फोटोंमध्ये दिसली 'ती' गोष्ट, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.