‘बिग बॉस’या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकार लोकप्रियेच्या शिखरावर पोहोचले. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. अभिनय व नृत्य कौशल्याने तिने अनेकांची मन जिंकली. ‘बिग बॉस’च्या घरात तिचा वावर साऱ्या प्रेक्षकांना भावला. सई, पुष्कर व मेघा या त्रिकुटाची मैत्री प्रेक्षकांना विशेष आवडली. ‘बिग बॉस’ मधून बाहेर आल्यानंतर सिनेसृष्टीतला तिचा वावर कमी झालेला पाहायला मिळाला. कारण या शोनंतर ती तिच्या संसारामध्ये रमली. ‘बिग बॉस मराठी’नंतर सईने लग्न करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. (Sai Lokur baby Shower)
लवकरच आता सई एका गोंडस अशा बाळाला जन्म देणार आहे. सई व तीर्थदीप आई-बाबा होणार आहेत. तिच्या आयुष्यात एका चिमुकल्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. त्यापूर्वी मोठ्या उत्साहात सईचं डोहाळ जेवण पार पडलं आहे. मॉर्डन अंदाजात सईच्या मैत्रिणींनी हे डोहाळ जेवण केलं होत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र यातही नेटकरी आणखी एका अभिनेत्रीबद्दल विचारपूस करत आहेत.
सईच्या डोहाळ जेवणाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाले आहेत. या तिच्या डोहाळ जेवणाचं आयोजन तिच्या मैत्रिणींनी केलं होत. त्यांचेही सईबरोबरचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र असं असलं तरी नेटकरी एका दुसऱ्याच अभिनेत्रीबद्दल विचारपूस करताना दिसत आहेत. ही अभिनेत्री आहे मेघा धाडे. ‘बिग बॉस’ मराठी सीझन १ ची विजेती अभिनेत्री मेघा व सई खूप जवळच्या मैत्रिणी आहेत.


मेघा व सईची मैत्री आपण ‘बिग बॉस’च्या पहिल्या पर्वात सर्वांना पाहायला मिळाली. त्यामुळे जवळच्या मैत्रिणीच्या डोहाळ जेवणाला मेघा न दिसल्याने अनेक नेटकरी तिच्याबद्दल सईच्या डोहाळ जेवणाच्या पोस्टवर कमेंट करत विचारत आहेत. नेटकरी कमेंट करत ‘मेघा कुठे आहे, ती या प्रसंगी तिथे असायला हवी होती’, असं म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत, ‘मेघा नाही दिसली, तुझी बेस्टफ्रेंड होती ना?’ असं म्हटलं आहे. अद्याप नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर सई वा मेघा यांपैकी कोणीही भाष्य केलेलं नाही.