मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. तिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. गौतमी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती विविध फोटोज् व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतो. तिची व मृण्मयीची भांडण तर सोशल मीडियावरील ट्रेन्डींग विषयांपैकी एक आहे. बऱ्याचदा या दोघी व्हिडीओतून एकमेकींची पोलखोल करताना, रडताना, भांडत करताना दिसतात. या सगळ्या व्हिडीओंना चाहत्यांकडून बरंच प्रेम मिळताना दिसतं.पण बऱ्याचदा काही नेटकरी तिची व मृण्मयीची तुलनाही करत असतात.(Gautami Deshpande reply to troller)
आताही एका नेटकऱ्याने या दोघी बहिणींची तुलना करत गौतमीला प्रश्न विचारला. त्यावर गौतमीने तिच्या वेगळ्या अंदाजात सडेतोड उत्तर दिलं आहे. गौतमी मुंबईत प्रवास करताना विविध वाहनांचा वापर करत असते. कधी ती रिक्षातून तर कधी मेट्रोतून प्रवास करत असते. अशीच ती काल रिक्षामधून कुठेतरी बाहेर गेली होती. तेव्हा तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत प्रश्न उत्तरांचा सेशन घेतलं होतं. त्यात ‘ती कुठे जात असेल’ याबाबत चाहत्यांना ओळखायला सांगितलं होतं.

आणखी वाचा –
गौतमीच्या या प्रश्नावर बऱ्याच चाहत्यांनी विविध उत्तरं दिली. त्यात एका नेटकऱ्याने लिहीलं, ‘तुझ्याकडे गाडी नाही का? सारखं रिक्षातून फिरत असतेस. तुझी बहीण बघ किती सुंदर व कर्तुत्ववान आहे’. नेटकऱ्याच्या या प्रतिक्रियेवर गौतमीने तिच्या हटके अंदाजात उत्तर दिलं.या प्रतिक्रियेवर उत्तर देत तिने ती स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअरही केली आहे.
त्यात तिने लिहीलं, ‘मला अशी लोकं आवडतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की, माझ्याकडे खूप चांगली गाडी आहे पण मुंबईत असल्यावर बऱ्याचदा मेट्रोतून प्रवास करणं सोयीस्कर असतं. माझ्या गाडीपेक्षा मला माझा वेळ जास्त मौल्यवान आहे. मला आशा आहे की तुम्ही मोठे व्हाल आणि कर्तुत्ववानही व्हाल’, असं दमदार उत्तर दिलं आहे. गौतमीची ही स्टोरी सध्या सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे. यामुळे गौतमी पुन्हा बरीच चर्चेत आली आहे.