बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या बरीच चर्चेत आली आहे. यावर्षी आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. नुकतंच तिला ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ज्यासाठी ती पती रणबीरसह दिल्लीला गेली होती. आता नवरात्रीच्या शुभमुहूर्तांवर अभिनेत्रीने एक नवीकोरी अलिशान कारची खरेदी केली आहे. ज्याचा व्हिडीओ नुकतंच समोर आला आहे. (Alia Bhatt buys a New Car)
आलियाने नवरात्रीच्या मुहूर्तांवर रेंज रोव्हरची ‘Autobiography Long Wheel’ ही नवीकोरी अलिशान कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत तब्बल ३.८१ कोटी रुपये असल्याचं बोलले जात आहे. दरम्यान, या नव्या कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात या कारला फुलांची सजावट करताना स्पष्ट दिसत आहे. अभिनेत्रीची ही अलिशान कार काळ्या रंगाची आहे.
हे देखील वाचा – बॉक्स ऑफिसवर थलापती विजयच्या ‘लिओ’चा बोलबाला, पहिल्याच दिवशी चित्रपटाने कमावले इतके कोटी
दरम्यान, आलियाकडे याआधी अनेक महागड्या कार्स आहेत. ज्यामध्ये लँड रोवरची Range Rover Vogue, ऑडी A6, BMW 7-Series, Audi Q5, Audi Q7 या कार्सचा समावेश आहे. तर रणवीरकडेही लँड रोवरची Range Rover Autobiography, ऑडी A8 L, Mercedes-Benz G63, Audi A8 L, Audi R8 अश्या अनेक अलिशान कार्स आहेत.
हे देखील वाचा – Video : हेमा मालिनी यांच्या बर्थडे पार्टीमध्ये धर्मेंद्र यांच्या पायाजवळच बसून राहिला सलमान खान, जमीनीवरच बसला अन्…; व्हिडीओ व्हायरल
आलियाला बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे, हा तिच्या करिअरमधील पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. नुकतंच तिने ‘हार्ट ऑफ स्टोन’ या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आलिया ‘जिगरा’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.