बॉलिवूडच्या पॉवर कपल्समध्ये अभिनत्री रत्ना पाठक शाह व अभिनेता नसीरुद्दीन शाह यांची गणना केली जाते. हे कपल नेहमी कोणत्याही मुद्द्यावर आपलं स्पष्ट मत मांडताना दिसतात. मग ते वैयक्तिक आयुष्याबाबत असो किंवा इतर कोणत्याही विषयांवर असो ते नेहमीच खुलेपणाने बोलताना दिसतात. सध्या रत्ना पाठक शाह त्यांच्या ‘धक धक’ चित्रपटामुळे चर्चेत असलेल्या पाहायला मिळत आहेत. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी चित्रपटाबाबत वक्तव्य केलच पण त्याचबरोबर त्यांचे पती नसीरुद्दीन शाह यांच्या जुन्या अफेअर्स व पहिल्या पत्नीच्या घटस्फोटाबाबत वक्तव्य केलं. (Ratna Pathak shah on husband naseeruddin shah)
‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ ला दिलेल्या एका मुलाखतीत रत्ना पाठक शाह यांनी नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबरची पहिली भेट आणि थिएटरच्या दिवसांपासूनच्या त्यांच्या पूर्वीच्या नात्यांबद्दल सांगितलं. रत्ना यांनी सांगितलं की त्या व नसीरुद्दीन शाह एकत्र एक नाटक करत होते. त्या नाटकाचं नाव संभोगपासून संन्यासपर्यंत असं होतं. तिच्या अनुषांगाने त्या व नसीरुद्दीन शाह यांना कमीवेळातच कळलं होतं की त्यांना एकत्र राहायचं आहे. रत्ना म्हणाल्या, “आम्ही मुर्ख होतो, आम्ही जास्त प्रश्न विचारले नाहीत. आजचे लोकं अगदी योग्य प्रश्न विचारायचे. आम्ही म्हणालो हे नातं खूप छान आहे. प्रयत्न तर करू. हे नातं पुर्णपणे तात्पुरत्या स्वरुपाचं होतं. याचं श्रेय कोणीही घेऊ शकत नाही. पण हे नातं टिकलं”.

नसीरुद्दीन शाह यांचा पहिला विवाह परवीन मुराद उर्फ मन्नारा सिक्री यांच्याशी झाला होता. पण नंतर नसीरुद्दीनने रत्ना पाठक यांच्यासह विवाहगाठ बांधली. त्यावेळी नसीरुद्दीन आपल्या पहिल्या पत्नीपासून वेगळे झाले होते. नसीरुद्दीन यांच्या भूतकाळाशी तिच्या पूर्व पत्नीचा काहीही संबंध नसल्याचं रत्ना यांनी सांगितलं. रत्ना मिळाल्या, “माझा त्यांच्या मागील आयुष्याशी काहीही संबंध नव्हता. मी तेव्हा प्रेमात होते. ते आपल्या पहिल्या पत्निपासून बऱ्याच काळापासून लांब होते. याचदरम्यान, त्यांचे इतरही अनेक अफेअर्स होते. तो सर्व आता भूतकाळ आहे. त्यानंतर मी त्यांच्या आयुष्यात आले. मी शेवटपर्यंत आहे तोपर्यंत सगळं ठीक आहे. मला काहीही हरकत नाही”.

रत्ना पुढे म्हणाल्या, नसीरुद्दीन शाहबरोबर झालेलं त्यांचं लग्न इतर लग्नांसारखं नव्हतं. लग्नाच्या एका आठवड्यानंतर त्या व नसीरुद्दीन शाह हनीमूनला गेले होते. पण तिथून आम्ही मध्येच परतलो. रत्ना म्हणाल्या, “नसीरने जाने भी दो यारों चित्रपटाचं शूटिंग सुरु केलं आणि त्यानंतर बरेच दिवस मी त्यांना पाहिलं ही नव्हतं. हे माझ्यासाठी खूप कठीण आणि आश्चर्यकारक होतं. ते जायचे आणि तीन दिवसांनी परत यायचे. त्यामुळे ते जीवंत आहे की मेले किंवा कोणाबरोबर पळून गेले हे ही मला माहित नव्हतं. तेव्हाचा तो खराच वेडेपणा होता”, असं सांगत त्यांनी भूतकाळातील गोष्टींचा खूलासा केला.