रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये सहभागी होण्यासाठी अनेक कलाकार मंडळींची नावे समोर आली. यापैकी एक नाव म्हणजे दीपिका पादुकोण. दीपिका खरंच रोहित शेट्टीसह काम करणार का असा प्रश्न पडला होता, आता मात्र या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. दीपिका ‘सिंघम अगेन’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ‘सिंघम’ चित्रपटाचा तिसरा सिझन आहे. रोहित शेट्टीने दीपिकाचं स्वागत करणारी एक खास पोस्ट शेअर करून साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या पोस्टमध्ये दीपिकाला हटके व स्टाईलमध्ये पोलिसांचा गणवेश परिधान केलेलं पाहून चाहत्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला. (Ranveer Singh On Deepika Padukon)
नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर, रोहित शेट्टीने चाहत्यांना त्याच्या चित्रपटातील पहिल्या महिला पोलिसाची ओळख करून दिली. चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करून दीपिका पदुकोणचा रावडी लूक पाहायला मिळाला. पोस्टरमध्ये दीपिका पदुकोण एका गुन्हेगाराच्या तोंडावर बंदूक ठेवताना दिसत आहे. सिंघम लेडीचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. दीपिका पदुकोणचा पती अभिनेता रणवीर सिंहने देखील बायकोच कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. त्याने नव्या ‘सिंघम लूक’चं भरभरून कौतुक करत एक खास पोस्ट शेअर केली आहे. रणवीरने चित्रपटातील दीपिकाचा पहिला लूक शेअर करत “आली रे आली दीपिका पदुकोण…आग लगा देगी” असं कॅप्शन दिलं आहे.

रोहित शेट्टीनेही ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करून दीपिका पदुकोणचे कौतुक केलं. रोहित शेट्टीने या पोस्टला कॅप्शन देत म्हटलं आहे की, ‘स्त्री ही सीतेचे तसेच दुर्गेचे रूप आहे. आमच्या पोलीस विश्वातील सर्वात क्रूर व हिंसक अधिकाऱ्याला भेटा. शक्ती शेट्टी, माझी लेडी सिंघम, दीपिका पदुकोण”. दीपिका पदुकोणचा फर्स्ट लूक पोस्टर पाहिल्यानंतर चाहते अधिक उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.
रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अजय देवगण बाजीराव सिंघम या निर्भय व प्रामाणिक पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच करीना सिंघमच्या पत्नीची भूमिका पुन्हा साकारणार आहे. याशिवाय रणवीर सिंग आणि अक्षय कुमारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. पुढील वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.